मुलांच्या ‘नर्व्हस सिस्टीम’वर परिणाम करतो ‘कोरोना’, AIIMS मध्ये आढळलं पहिलं प्रकरण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नवी दिल्ली स्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये कोरोना विषाणूमुळे एका 11 वर्षाच्या मुलीच्या मेंदूत मज्जातंतूचे नुकसान झाल्याची प्रथम घटना समोर आली आहे. यामुळे तिच्या दृष्टीवरही परिणाम झाला आहे. मुलांच्या न्यूरोलॉजी विभागातील डॉक्टर तिच्या तब्येतीचा अहवाल तयार करत आहेत. लवकरच यास प्रकाशित केले जाईल.

अहवालाच्या मसुद्यात असे म्हटले गेले आहे की, ‘आम्हाला एका 11 वर्षांच्या मुलीमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे तीव्र डिमिलिनेटिंग सिंड्रोम (एडीएस) सापडला आहे. जो मुलांमध्ये आढळतो.’ मज्जातंतूंना एका संरक्षक थराने कव्हर केले जाते, ज्यास मायलिन म्हटले जाते, जे मेंदूतून संदेशांना आपल्या शरीराच्या माध्यमातून तातडीने आणि सहजपणे स्थानांतरित करण्यास मदत करतात. एडीएसमध्ये आरोग्याच्या स्थिती समाविष्ट आहेत ज्या मायलीन, मेंदूच्या संकेतांना नुकसान पोहोचवतात आणि मज्जातंतू संबंधित कार्य जसे की दृष्टी, स्नायूंच्या हालचाली, इंद्रिय, मूत्राशय आणि आतड्यांसंबंधी हालचाली इत्यादींना प्रभावित करतात.

एम्सच्या बाल न्यूरोलॉजी विभागातील बालरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शेफाली गुलाटी म्हणाल्या, ‘ही मुलगी आमच्याकडे दृष्टीच्या कमतरतेमुळे आली होती. एमआरआयवर पाहिलेले एडीएस, जे एक नवीन प्रकटीकरण आहे. तथापि, आम्हाला आता माहित आहे की विषाणू मेंदू आणि फुफ्फुसांवर ठळकपणे परिणाम करतो. आम्ही या प्रकरणाचा अहवाल प्रकाशित करण्याचे ठरविले आहे कारण आम्हाला आढळून आले आहे की त्या मुलीची अशी स्थिती कोरोनामुळे झाली आहे.

अधिक माहिती म्हणजे डॉक्टर गुलाटी यांच्या देखरेखीखाली मुलीवर उपचार सुरू होते. इम्यूनोथेरपीमुळे तिची प्रकृती सुधारली आणि जवळपास 50 टक्के दृष्टी परत आल्यानंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. दरम्यान एम्सचे डॉक्टर अजून एका कोरोना पॉझिटिव्ह मुलीवर उपचार करीत आहेत. तिला ताप आणि एन्सेफॅलोपॅथी (मेंदूतील सूज) ची समस्या होती. डॉक्टर अजूनही तिची प्रकृती कोरोनामुळे बिघडली आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बालरोग न्यूरोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका समीक्षेमध्ये डॉ. गुलाटी म्हणाल्या, ‘एका विकसनशील देशात बालरोगतज्ज्ञांसमोर असणारी आव्हाने ही विशिष्ट आहेत. आमच्यासहित काहीच केंद्र, राऊंड-दि-क्‍लॉक चाईल्ड न्यूरोलॉजी टेली-हेल्पलाइन आणि टेली-समुपदेशन सेवा चालवितात, परंतु ग्रामीण कुटुंबांमध्ये व्हिडीओ कॉल आणि इंटरनेट सुविधेची मर्यादित उपलब्धता त्यांच्या कार्यक्षम वापरास मर्यादित करतात.’