भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देणे म्हणजे मुस्लिमांच्या जखमेवर मीठ चोळणे : ओवैसी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देणे म्हणजे बॉम्बस्फोटात मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा भाजपचा प्रकार आहे. हा प्रकार मुस्लिमांनी विसरु नये. साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देऊन भाजपाला धर्मयुद्ध छेडायचे आहे. असे वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. साध्वी प्रज्ञासिंहप्रमाणे गांधींना मारणारे कोण होते. त्यापैकी कोणी आज जिवंत असते तर त्यालाही भाजपाने उमेदवारी दिली असती अशी टीकाही त्यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्यातील मतदान झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान राहिलेल्या मतदार संघांमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. याचदरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदारांसभाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आले. मात्र पाच वर्षांत अच्छे दिन तर आलेच नाहीत. मात्र आता जनता पूर्वीचे बुरे दिन तरी परत करा, असे म्हणण्याच्या मन:स्थितीत आहेत. असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी म्हंटले. याचबरोबर, जीएसटीमुळे गरिबांचेही कंबरडे मोडले. आणि ते बेरोजगारांना नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचे काय झाले ? असा सवालही त्यांनी केला.

इतकेच नव्हे तर, भोपाळमधून बॉम्बस्फोट आणि दहशतवादासारखे गंभीर आरोप असलेल्या महिलेला भाजपाने उमेदवारी दिली आहे. बॉम्बस्फोटात मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा भाजपचा हा प्रकार आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देऊन भाजपाला धर्मयुद्ध छेडायचे आहे. असेही त्यांनी म्हंटले. तसेच मुस्लिमांनी हा प्रकार विसरु नये. गांधींना मारणारे कोण होते, त्यापैकी कोणी आज जिवंत असते तर त्यालाही साध्वी प्रज्ञासिंहप्रमाणे भाजपाने उमेदवारी दिली असती. अशी टीकाही त्यांनी केली.

Loading...
You might also like