UP मध्ये वापरणार बिहारचा फॉर्म्युला, AIMIM-BSP सोबत लढणार विधानसभा निवडणूक !

लखनऊ : बिहार विधानसभा निवडणुकीत बीएसपी प्रमुख मायावती आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी एकत्रित येऊन मोठा चमत्कार दाखवू शकले नसले तरी, अर्धा डझन जागा जिंकण्यात आवश्य यशस्वी झाले आहेत. ही जोडी आता उत्तर प्रदेशात होणार्‍या 2022 च्या निवडणुकीच्या राजकीय लढाईत दलित-मुस्लिम कार्ड खेळण्याचा डाव खेळू शकतात. एआयएमआयएमने आगामी निवडणुका पाहता बीएसपीच्या समोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. अशावेळी मायावती यांनी जर ओवैसी यांच्यासोबत हातमिळवणी केली तर राज्यात इतर राजकीय पक्षांची गणिते बिघडू शकतात.

बिहारच्या विजयाने उत्साहित एआयएमआयएमने युपीत पक्षाचा राजकीय आधार वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. एआयएमआयएमने विधानसभा निवडणुका पाहता राज्यात पक्ष मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. मागील एक महिन्यात सुमारे 20 जिल्ह्यात नवे जिल्हा अध्यक्ष बनवण्यात आले आहेत. याशिवाय पक्षात नवे सदस्य सहभागी करून घेण्याचे अभियानही तीव्र केले आहे.

एआयएमआयएम यूपी अध्यक्ष शौकत अली यांनी म्हटले की, यूपीमध्ये ओवैसी-मायावती मिळूनच धार्मिक शक्तींना सत्तेत येण्यास रोखू शकतात. याशिवाय एसपी, बीएसपी आणि काँग्रेस कुणीही एकटा भाजपाला रोखू शकत नाही. यूपीत दलित आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या समस्या एकसारख्याच आहेत आणि लोकसंख्या सुद्धा जवळपास सारखीच आहे. आम्ही तर मागील निवडणुकीत सुद्धा बीएसपीसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी होऊ शकली नाही. बिहार निवडणुकीत एक राजकीय प्रयोग यशस्वी झाला आहे. यूपीत सुद्धा तो केला पाहिजे.

त्यांनी म्हटले की, यूपीमध्ये सुमारे 21 टक्के दलित आणि 20 टक्के मुस्लिम आहेत. अशावेळी दलित-मुस्लिम मिळून भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखू शकतात. आमचा पक्ष सुरूवातीपासूनच दलित-मुस्लिम एकतेवर काम करत आहे. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये हे प्रत्यक्षात केले आहे. बीएसपी कोणत्याही आधाराशिवाय आगामी निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या स्थितीत नाही.

बीएसपी उत्तर प्रदेशात नवीन जातीय समीकरण जुळवण्याच्या तयारीत आहे. मुस्लिम मतांवर जास्त फोकस करण्याऐवजी अति मागासलेल्या मतदारांना टार्गेट करत आहे. याच कारणामुळे त्यांनी भीम राजभर यांना पक्षाची सूत्रं दिली आहेत. याशिवाय नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बीएसपीने बुलंदशहर जागेवर मुस्लिम उमेदवाराला उतरवले होते आणि तो दुसर्‍या नंबरवर होता.

बीएसपी नेत्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, बीएसपीमध्ये ओवैसी यांच्यासोबत आघाडी करण्याबाबत विचार सुरू आहे, परंतु अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. नुकतीच ज्याप्रकारे मुस्लिम आमदारांनी पक्षाशी बंडखोरी केली आहे, त्यानंतर मायावती यांनी मुस्लिमांना जोडण्यासाठी वेगळी रणनीती बनवली आहे. याच रणनीती अंतर्गत ओवैसी यांच्यासोमवार आघाडी करण्याचा फॉर्म्युला आहे. अशाप्रकारे दलित-मुस्लिमचे मजबूत राजकीय कार्ड खेळून बीएसपी यूपीमध्ये आपल्या विरोधकांना मोठे आव्हान देऊ शकते.