हैद्राबादला जात असलेल्या एयर अ‍ॅम्ब्युलन्सचे मुंबईत इमर्जन्सी ‘बेली’ लँडिंग, टेक ऑफ दरम्यान निघाले होते एक चाक (Video)

हैद्राबाद : वृत्त संस्था – हैद्राबादला जात असलेल्या एका एयर अ‍ॅम्ब्युलन्सचे मुंबईत गुरुवारी इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. एयर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही स्थिती निर्माण झाली. या एयर अ‍ॅम्ब्युलन्सने नागपुरहून हैद्राबादसाठी उड्डाण घेतले होते. जेट सर्व्ह एव्हिएशनकडून संचालित सी-90 व्हीटी-जेआयएल विमानाचे मुंबई विमानतळावर यशस्वी लँडिंग करण्यात आले.

रिपोर्टनुसार, टेक ऑफच्या दरम्यान एयर अ‍ॅम्ब्युलन्सचे एक चाक वेगळे झाले होते. चालक दलाने दुजोरा दिला की, पायलटने लँडिंग गियरचा वापर न करता एयर अ‍ॅम्ब्युलन्सचे ‘बेली लँडिंग’ केले. आगीपासून बचावासाठी रन-वे वर फोम पसरवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुर एयरपोर्टवरून टेक ऑफच्या दरम्यान विमानाचे एक चाक वेगळे झाले होते आणि दूर जाऊन पडले होते.

बेली लँडिंग म्हणजे काय ?
बेली लँडिंग किंवा गियर-अप लँडिंग तेव्हा होते जेव्हा एखादे विमान आपल्या लँडिंग गियर शिवाय लँड होते आणि ते मुख्य लँडिंग डिव्हाइसच्या रूपात आपल्या अंडरसाईड, किंवा बेलीचा वापर करते. सामान्यपणे गियर-अप लँडिंग टर्मचा वापर त्या स्थितीत होतो जेव्हा पायलट लँडिंग गियरचा वापर करण्यास विसरतो, तर बेली लँडिंग त्या स्थितीशी संबंधीत आहे जेव्हा तांत्रिक बिघाडमुळे पायलट गियरचा वापर करू शकत नाही.

5 लोकांना सुरक्षित बाहेर काढले
विमानतळानुसार, विमान उतरल्यानंतर सर्व पाच लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुंबई विमानतळाच्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, विमानात चालक दलाचे दोन सदस्य, एक रूग्ण, त्याचे नातेवाईक आणि एक डॉक्टर होते. हे विमान गुरुवारी नऊ वाजून नऊ मिनिटांनी विमानतळावर उतरले.