खुशखबर ! ‘या’ कंपनीचं तिकीट फक्‍त 899 मध्ये बुक करा अन् विमानानं प्रवास करून मजा घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही लवकरच विमान प्रवास करण्याचा विचार करत असल्यास तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. यामध्ये तुम्ही 899 रुपयांमध्ये विमान प्रवास करू शकणार आहात. एयर एशिया इंडिया या विमान कंपनीने हि भन्नाट संधी तुमच्यासाठी आणली आहे. यामध्ये तुम्हाला देशांतर्गत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता.

गुरुवारपर्यंत करा बुकिंग
एयर एशियाने तीन दिवसांपासून हि बुकिंग सुरु केली आहे. 24 सप्टेंबर पासून हि बुकिंग सुरु झालीय असून 26 सप्टेंबरपर्यंत तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. या कालावधीत तिकीट खरेदी केल्यानंतर तुम्ही 10 फेब्रुवारी 2020 ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीत त्या तिकिटावर प्रवास करू शकणार आहात.

येथे करा बुकिंग
एयर एशियाच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला airasia.com या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करायचे आहेत. या योजनेच्या उद्धाटनावेळी कंपनीचे सीओओ संजय कुमार यांनी म्हटले कि, स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे कमीत कमी दरात सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हि ऑफर दिली आहे.