आता ‘भागलपुरी’ सिल्क साडयांमध्ये दिसणार ‘हवाई’ सुंदरी, एअर इंडियाकडून परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भागलपूरच्या व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भागलपुरी तसर रेशीम स्टॉल एअर इंडियाच्या विमानांमध्ये दिसणार आहे. हे रोशीम स्टॉल एअर होस्टेसच्या गळ्यात दिसणार आहे. एअर इंडियाने या व्यापाऱ्यांकडे १९ हजार ९२० स्टॉल्सची मागणी केली आहे. भागलपूरच्या आठ खादी हातमाग समिती एअर इंडियाला स्टॉल्स पुरवतील.

६ ऑगस्ट रोजी दिल्लीत खादी ग्रामोद्योग आयोग आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत स्टॉल खरेदी करण्यास त्यांच्यात सहमती दर्शविली गेली. एअर इंडियाची यादी भागलपूरच्या विणकर समितीला पाठवण्यात आली आहे. यात भागलपूरच्या तासार रेशीम साड्या, राजस्थानची पाली खादी चा ब्लाऊज आणि पेटीकोट तसंच कानपूरच्या बाजारातून उलन खादी कपड्याची खरेदी ही करण्याचा निर्णय घेतला आहे. हा स्टॉल सोनेरी रंगाचा असणार आहे. या एखा स्टॉलची किंमत १५०० रुपये असणार आहे. अशी माहिती बिहार राज्य कल्याण समितीचे सदस्य अलीम अन्सारी यांनी दिली आहे.

अमेरिका, जपानसह अरब देशांमध्येही याची मागणी सुरु आहे. भागलपूर आणि बांका येथे दरवर्षी सुमारे १.२५ लाख तासार रेशीम स्टॉल्स तयार केले जातात. व्यापाऱ्यांच्या मते दिल्ली, मुंबई, बेंगलुरू यासह जपान, मलेशिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या मोठ्या शहरांव्यतिरिक्त युरोपमधील देशांमध्येही या स्टॉल्सचा मोठी मागणी आहे, असंही अन्सारी यांनी सांगितलं.

भागलपुरी रेशीम हे फक्त दुकानांतच विकले जात नसून याची ऑनलाईन विक्री चांगली होते. प्रसिद्ध कंपन्या हे कापड खरेदी करत आहेत. ऑनलाईन व्यवसाय करणार्‍या बड्या वेबसाइट्समध्ये तसार रेशीम साड्याही खरेदी केल्या जात आहेत. अशीही माहिती अन्सारींनी यावेळी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –