खासदार वंदना चव्हाणांच्या ऑमलेटमध्ये आढळलं अंड्याच ‘टरफल’, एअर इंडियानं घेतली ‘अ‍ॅक्शन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विमान प्रवाशांसाठी जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी कडक नियमावली आहे. अशातच एक घटना समोर आली आहे जिची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. एअर इंडियाच्या विमानात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांना निकृष्ट खाद्यपदार्थ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एअर इंडियाने केटरिंग एजन्सीवर कारवाई करून कठोर दंड वसूल केला आहे.

एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, एअर इंडियाने या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले असून कॅटरिंग एजन्सीला दंड ठोठावला आहे. त्यानुसार एजन्सीला संपूर्ण उड्डाणाचा हँडलिंग चार्ज आणि भोजन खर्च भरावा लागणार आहे. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून कठोर कारवाई करण्यात आली असल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.
Vandana Chavhan

काय आहे प्रकरण :
खरं तर राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करत काही छायाचित्रे शेअर केली होती. यात त्यांनी लिहिलं होतं की काही दिवसांपूर्वी पुण्याहून दिल्ली उड्डाणादरम्यान त्यांच्या नाश्त्याच्या ऑमलेटमध्ये अंड्यांच्या शेलचे तुकडे आढळून आले. बटाटे कुजलेले आणि सोयाबीन कच्चे असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी पुढे असेही लिहिले की कंपनीला याबाबत सांगूनही गांभीर्याने घेतले गेले नाही यामुळे निराशा वाटते. यानंतर मला वाटलं की ते लोकांसमोर आणलं पाहिजे.

यावेळी वंदना चव्हाण यांनी ट्विटरवर ब्रेकफास्टची छायाचित्रे पोस्ट केली होती. यानंतर एअर इंडियाने सांगितले की हे प्रकरण निदर्शनास आले असून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. त्यानंतर एअर इंडियाने ही कारवाई केली आहे.

Visit : Policenama.com