खुशखबर ! आता एअर इंडियाच्या विमानातुन हज यात्रेकरू घेऊन जाऊ शकतात ‘जमजम’चं पाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हज यात्रेकरूंसाठी एक फार मोठी आनंदाची बातमी आहे. चार जुलै रोजी एअर इंडियाच्या जेद्दाह ऑफिसमधून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार फ्लाइट्स (AI९६६ आणि AI९६४) मधून जमजम मधील पाणी घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र आता हि बंदी हटवण्यात आली आहे.

यामुळे घालण्यात  आली होती बंदी –

या पत्रकात लिहिण्यात आले होते कि, १५ सप्टेंबर रोजी जेद्दाह-हैदराबाद-मुंबई आणि जेद्दाह-कोचिन या दोन फ्लाइट्समधून प्रवाशांना जमजम मधील पाणी घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. एयरक्राफ्ट मध्ये करण्यात आलेला बदल आणि कमी जागेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

काँग्रेस आमदाराने लिहिले पत्र

या सर्व प्रकारानंतर हज यात्रेकरूंनी काँग्रेस आमदार अमीन पटेल यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. अमीन यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाला यासंदर्भात पत्र लिहून हज यात्रेकरूंना पाणी घेऊन जाण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विमान मंत्रालयाने या पत्राची दाखल घेत या भाविकांना हे पाणी घेऊन येण्याची परवानगी दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1148454938412036097


‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर