Video : कसा झाला केरळ विमान अपघात ? प्रत्यक्षदर्शी CISF जवानानं सांगितलं नेमकं काय घडलं

कोझिकोड : वृत्तसंस्था – केरळ येथील कोझिकोड एअरपोर्टवर झालेल्या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील अनेकजण अद्यापही रुग्णालयात भर्ती आहेत. तर एअरपोर्टवर तैनात केंद्रीय औद्योगिक बल म्हणजेच CISF चा जवान अजीत सिंह यांनी या संपूर्ण अपघाताची परिस्थिती सांगितली आहे. त्यांच्या डोळ्यादेखत हा अपघात झाला. ते म्हणाले, मी एयर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटला पॅरामीटर रोडवर कोसळताना पाहिले. अजित यांनी सांगितले की, हा विमान अपघात मी माझ्या डोळ्यांनी पाहिला.

अजित यांनी पुढे सांगितले की, सायंकाळी साडे सात वाजता मी तिसऱ्या राऊंडमध्ये निघालो होतो. या दरम्यान आपात्कालिन फायर गेटवर पोहचलो आणि तेथे ASI मंगल सिंह ऑन ड्युटी होते. अजित यांनी सांगितले की, मी सही करण्यासाठी बीट बुट मागितलं आणि यानंतर मंगलशी बोलत होतो. तेव्हा पाहिलं की एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट आपलं संतुलन गमावून पॅरामीटर रोडवरून खाली कोसळत होतं. त्यांनी पुढे सांगितले की, त्याचवेळी याबाबत कंट्रोल रुमला सांगण्यात आलं आणि तोपर्यंत विमान जमिनीवर कोसळंल होतं.

अजित सिंह पुढे सांगितले की, गेट नंबर 1 तातडीने खोलण्यात आलं आणि तब्बल 25 ते 30 प्रतिनिधी आत गेले. जेसीबी आले. त्यानंतर विमानाच्या ढिगाऱ्यातून दबलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. आम्ही CISF चे जवान विमानाच्या आतील प्रवाशांना बाहेर काढत होतो. रुग्णवाहिका आली आणि त्यातून प्रवाशांना रुग्णालयात पाठवण्यात आले. विमानाचे दोन तुकडे झाले होते. शक्य तितक्या तातडीने सर्वजण ढिगाऱ्यातून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.