राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विमानात ‘बिघाड’, 3 तास उशिराने सुरु केला प्रवास

नवी दिल्ली – वृत्तसंस्था : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना घेऊन जाणारे विमान रविवारी झुरिक (स्वित्झर्लंड) मधील एअर इंडिया वनमध्ये बिघाड झाला. त्यानंतर विमानाने 3 तास उशीरा उड्डाण केले. राष्ट्रपती आयसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौर्‍यावर आहेत. एअर इंडिया वन विमानाच्या मागील पंख्यामंध्ये खराबी आल्याचे सांगितले जात आहे. हे विमान झ्यूरिकहून स्लोव्हेनियाला जाणार होते.

17 सप्टेंबर रोजी संपणार दौरा
राष्ट्रपती आइसलँड पासून दौऱ्याला सुरुवात करणार होते त्यानंतर स्विझर्लंडला जाणार होते त्यानंतर ते स्लोविनियाला जाणार होते. राष्ट्रपती 17 सप्टेंबर रोजी दौरा आटोपून पुन्हा माघारी येणार आहेत.

विमानाच्या अचानक झालेल्या खराबीमुळे राष्ट्रपतींना काही काळासाठी विमानतळावर थांबावे लागले मात्र तीन तासांच्या उशीरानंतर राष्ट्रपतींनी आपला दौरा पुन्हा सुरु केला आहे.

पाकिस्तानच्या निर्णयावर नाराजी
आईसलँडला जाताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाकिस्तानच्या हवाई परिसरातुन जाण्यासाठी परवानगी मागितली होती मात्र पाकिस्तानने याला परवानगी नामंजूर केली. यामुळे पाकिस्तानच्या या निर्णयात सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.