‘कोरोना’च्या संकटादरम्यान सरकारवर पायलट ‘नाराज’, म्हणाले – ‘आमच्या सोबत टिशू पेपर सारखं नका वागू’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – वंदे भारत मिशन अंतर्गत अडकलेल्या भारतीयांना घरी आणणार्‍या एअर इंडियाच्या पायलट्सने वेतनाबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाकडे नाराजी व्यक्त केली आहे. अहवालानुसार, मंत्रालयाने एअर इंडियाच्या व्यवस्थापनाला पत्र लिहून म्हटले आहे की, विमानाचे उड्डाण करण्याच्या वास्तविक तासांच्या आधारावर वैमानिकांना वेतन द्यावे.

एका पायलटने सांगितले की, एअर इंडिया मॅनेजमेंट त्यांची खिल्ली उडवत आहे. त्याने म्हटले, “आतापर्यंत सरकार आम्हाला कोविड वॉरियर्स सांगत आहे, आम्हाला सांगितले जात आहे की आम्ही देशासाठी एक मोठे काम करत आहोत, तर दुसरीकडे आम्हाला जी वागणूक दिली जात आहे ती लज्जास्पद आहे.”

वापरलेल्या टिशू पेपरसारखी वागणूक देऊ नका
आणखी एका पायलटने सांगितले की, सरकारचा हा प्रस्ताव आम्हाला निराश करतो. आम्हाला व्यवस्थापनाला सांगायचे आहे की आमच्याशी वापरलेल्या टिशू पेपरप्रमाणे वागू नका.

पायलट संघटनेने ४ जून रोजी एका पत्रात म्हटले की, कोरोना संक्रमण काळात आम्ही सरकारला आमची आव्हाने आणि अडचणींबद्दल सांगत आहोत. सध्या काम करणे आमच्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक आहे. आमचे बरेच पायलट कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. आम्ही मार्च महिन्याचा भत्ता लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी व्यवस्थापनाला केली आहे. याशिवाय काही पायलट जे अटींची पूर्तता करू शकले नाहीत, त्यांनाही दिलासा मिळाला पाहिजे.

… तेव्हा आम्ही काम करण्याच्या परिस्थितीत नसू
३१ मे रोजी इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशनने व्यवस्थापनाला कठोरपणे एक पत्र लिहिले, “सर, तुम्हीसुद्धा मान्य कराल की वंदे भारत मिशन अंतर्गत आम्ही राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेने काम करत आहोत, परंतु त्या दरम्यान कर्मचाऱ्यांना जी वागणूक दिली जात आहे, ती योग्य नाही. आम्ही या वर्तनाचा निषेध करतो आणि आम्ही आवश्यक उड्डाण सोडून इतर कोणतीही उड्डाणे करण्याच्या स्थितीत राहणार नाही.

एअर इंडियाचा वक्तव्य करण्यास नकार
एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला आणि म्हणाले की विमान कंपन्या अंतर्गत बाबींवर वक्तव्य करत नाहीत.

केबिन क्रू देखील नाखूष
एअर इंडियाचा केबिन क्रू देखील सध्याच्या परिस्थितीवर खूष दिसत नाही. केबिन क्रू मेंबर्सचा आरोप आहे की, त्यांच्या विमासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण नाही आणि पीपीई किट परिधान करूनही क्रू मेंबर कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. यापूर्वी अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.