एअर इंडियामध्ये ‘केबिन क्रू’ पदांची मेगा भरती

पुणे : पोलिसनामा टीम – एअर इंडियामध्ये भविष्यातील आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तरेकडील क्षेत्रात केबिन क्रू म्हणून पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत आणि अजून अर्ज मागवण्यात येणार आहेत. येथील एकूण जागांची संख्या अजून स्पष्ट झाली नाही. पण यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खालील माहिती वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पदाचे नाव : केबिन क्रू पुरुष आणि महिला दोन्हींसाठी

शैक्षणिक पात्रता :या पदासाठी उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असावा. तसेच त्याला या कामाचा कमीतकमी १ वर्षाचा अनुभव असावा.

शारीरिक पात्रता : या पदासाठी पुरुषाची उंची १७२ सेमी असावी. आणि महिलेची १६० सेमी असावी.

वयाची अट : यासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे पूर्ण असावे. SC / ST या वर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सूट तसेच ओबीसी वर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सूट दिली जाईल.

नोकरी ठिकाण : उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठेही नोकरी करावी लागेल.

फी : ओपन / ओबीसी या वर्गातील उमेदवारांना १००० रुपये आणि एससी / एसटी उमेदवारांना फी नाही.

पहिल्या टप्यात जे उमेदवार अर्ज करतील त्यांची अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०१९ आहे. तर लेखी परीक्षा ७ जुलै २०१९ ला होईल.

दुसऱ्या टप्यात अर्ज करणाऱ्या उमेदवारांची अर्ज करण्याची शेवटची तारिख १७ जुलै २०१९ आहे. तर लेखी परीक्षा २८ जुलै २०१९ ला होईल.

तिसऱ्या टप्यात अर्ज करणाऱ्या उमेदवारांची अर्ज करण्याची शेवटची तारिख ७ ऑगस्ट २०१९ आहे. तर लेखी परीक्षा १८ ऑगस्ट २०१९ला होईल.

आरोग्यविषयक वृत्त –

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘