Air India Story | 46 वर्ष नफ्यात असणारी एअर इंडिया कर्जात कशी बुडाली? जाणून घ्या टोटल स्टोरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Air India Story | कर्जात बुडालेल्या एअर इंडियाच्या खरेदीसाठी (Air India Story) कोणीही पुढे येत नसल्याने सरकारनं (Modi Government) लिलावाची तारीख पुढे ढकलली होती. त्यामुळे एअर इंडियाच्या विक्रीचे मोठे आव्हान सरकार पुढं होतं.. अखेर सरकारच्या मदतीसाठी टाटा कंपनी (Tata Group) पुढे अली आहे. टाटानं एअर इंडियाला विकत घेण्यास स्वारस्य दाखवलं असून सरकारनं त्यावर शिक्कामोर्तब केलं. १८ हजार कोटींची बोली लावून संपूर्ण एअर इंडिया कंपनी टाटाने खरेदी केली आहे. या व्यवहारामुळे निर्गुंतवणूकीच्या बाबतीत केंद्र सरकारचं हे मोठं यश मानलं जात आहे.

एअर इंडिया आधी नफ्यात होती. पण एकदा तोट्याचे ग्रहण लागले की ते कधीही संपत नाही आणि तेच एअर इंडियाच्या (Air India Story) बाबतीत झाले. सरकारनंही एअर इंडियाचं जसं जसं कर्ज वाढत गेलं तसं त्यापासून दूर राहणेच पसंत केलं. एअर इंडियाचे एवढं कर्ज कस वाढल यामध्ये मोठा इतिहास आहे. सुरुवातीला एअर इंडियातील काही हिस्सा विकण्याची गोष्ट समोर आली होती. पण सरकारने वेगळी भूमिका घेतली. विमान कंपनी चालवणं हे सरकारच काम नसल्याने या कंपनीचा लिलाव करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. एका दशकापूर्वी इतकी मोठी कंपनी तोट्यात जाईल असा कोणीही विचार केला नव्हता. कारणही तसेच होत. त्यावेळी कंपनी नफ्यात नव्हती पण परिस्थितीवर मात करुन नफा कमावेल अशी अपेक्षा होती.

 

2000 सालापर्यंत नफ्यात होती कंपनी

सरकारांना हवाई वाहतूक देण्यासाठी 1954 साली दोन कंपन्या सुरु केल्या. त्यानुसार देशांतर्गत वाहतूकीसाठी इंडियन एअरलाइन्स आणि देशाबाहेरील सेवेसाठी एअर इंडिया (Air India Story) सुरु झाली. तेव्हापासून ते 2000 सालापर्यंत कंपनी नफा कमावत होती. कंपनीला इतक्या वर्षात पहिल्यांदाच म्हणजे 2001 मध्ये 57 कोटींचा तोटा झाला. त्यावेळी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकल मास्केयरनहास (michael mascarenhas air india) यांना दोषी ठरवत हवाई मंत्रालयाने त्यांना पदावरून काढले.

 

दिवाळं केव्हा निघालं?

इंडियन एअरलाइन्सचं (Indian Airlines) 2007 मध्ये एअर इंडियामध्ये विलनीकरण करण्यात आलं. त्यामुळे दोन्ही कंपन्यांचा एकूण तोटा 71 कोटी रुपये इतका झाला. विलनीकरणापूर्वी इंडियन एअरलाइन्सचा तोटा फक्त 230 कोटी रुपये इतका होता. कंपनी लवकरच नफ्यात येईल असा अंदाज होता. एअर इंडिया कंपनी विलनीकरणाआधी 541 कोटी इतक्या तोट्यात होती. 2006-07 सालचा हा अहवाल होता. त्यावेळी दोन्ही कंपन्यांच्या विलगीकरणामुळे दरवर्षी कोट्यवधींचा नफा मिळेल असा दावा करण्यात आला होता. मात्र वर्षागणिक तोटा वाढत गेला. तोटा कमी करण्यासाठी कंपनीने कर घेण्यास सुरुवात केली आणि तेथूनच कर्जाचे ओझे वाढण्यास सुरुवात झाली.

2005 मध्ये 111 विमानांची खरेदीचा निर्णय एअर इंडियाने घेतला होता हेच कारण कंपनीच्या आर्थिक संकटाच असल्याचं त्यावेळी माध्यमांनी म्हंटले होते. सुमारे 70 हजार कोटी खर्च करण्यात आले होते. इतका मोठा करार करताना कोणतंही नियोजन करण्यात आलं नव्हतं, असा आरोप करत बरच राजकारणही झालं. कंपनी तोट्यात जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे कंपनीचा ढिला कारभार. एअर इंडियाच्या विमानांच्या उड्डाणाला खूप विलंब व्हायचा. वेळापत्रकावर काटेकोर अंमलबजावणी केली जात नव्हती. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तक्रार तर नेहमीचच दुखणं बनलं होतं. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागायचं. 2018 साली एअर इंडियाकडे फक्त 13.3 टक्के मार्केट शेअर होता.

एअर इंडियाचा वापर सरकारी सेवांसाठी करण्यात आला. सरकारची थकबाकी वेळेवर मिळाली नाही.
त्यामुळे कंपनीचं कर्ज वाढत गेलं. 2009 मध्ये कंपनीला सावरण्यासाठी एअर इंडियाचे प्रमुख अरविंद जाधव (Arvind Jadhav) यांनी तीन वर्षात मोठ्या घोषणा केल्या.
यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी कपात आणि इतर उपाय सुचवले होते. मात्र, त्या विरोधात कर्मचाऱ्यांनी उपोषण, आंदोलनं सुरू केली.
पायलटांचाही यामध्ये सहभाग होता. एकूणच कंपनीला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं.

1932 मध्ये जेआरटी टाटा यांनी एअर इंडियाला सर्वप्रथम टाटा एअरलाइन्स नावानं लाँच केलं होतं.
त्यानंतर 1946 साली कंपनीचं नाव बदलून एअर इंडिया करण्यात आलं होतं. त्यानंतर 1953 ला टाटांकडून सरकारनं कंपनी खरेदी केली होती.

Web Title :- Air India Story | How did 46-year-old Air India sink into debt? know whole Story

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stocks | ‘हा’ 25 रुपयांचा शेयर तुम्हाला करू शकतो लखपती, वर्षभरात 9100 टक्के रिटर्न्स

Kolhapur News | पोलीस ठाण्यातच महिलेशी अश्लील वर्तन; कोल्हापुरातील घटनेने खळबळ

Bajaj Finance | पहिल्यांदाच अशी सुवर्णसंधी ! फक्त 101 रुपयात घरी आणू शकता Vivo चा प्रीमियम स्मार्टफोन, जाणून घ्या कधीपर्यंत आहे ऑफर