एअर इंडिया कर्जबाजारी, सरकार विकणार १०० टक्के हिस्सेदारी ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जेट एअरवेज नंतर आता एअर इंडिया अडचणीत सापडली आहे. केंद्रातील मोदी सरकार एअर इंडिया मधील १०० टक्के हिस्सेदारी विकून या अडचणीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या एका मंत्र्यांच्या मंडळांनी अजून काही निर्णय दिलेला नाही.

याविषयी बोलताना गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रतिबंध खात्याचे सचिव आतानू चक्रवर्ती यांनी सांगितले की, आक्टोबर नंतर एअर इंडियाजवळ कर्मचाऱ्यांनाही पगार देण्यासाठी पैसे शिल्लक राहणार नाहीत. सरकारच म्हणणं आहे की, जर गुंतवणूकदार एअर इंडिया कंपनीची पूर्ण हिस्सेदारी विकत घेत असतील तर ठीक आहे. पण मी या विषयावर तेव्हाच सांगू शकेल, जेव्हा यावर काही निर्णय घेतला जाईल. माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की, यासाठी सरकारकडून कुठली अडचण येईल या अगोदरच सरकार एअर इंडिया कंपनीला विकण्याचा विचार करत होती.

मागील वर्षी सरकार एअर इंडिया कंपनीला विकण्याचा निर्णय घेणार होती पण कच्या तेलाच्या किमतीमधील अस्थिरतेमुळे सरकारने विक्री थांबवली होती. आता सरकार पुन्हा या कंपनीच्या विक्रीला तयार झाली आहे.

नीती आयोगाने यासाठी प्रस्थाव दिला होता

या कंपनीची पूर्ण हिस्सेदारी विकण्याचा प्रस्ताव नीती आयोगाने दिला होता. परंतु सरकारने ७४ टक्के हिस्सेदारी विकण्याचे जाहीर केले होते. हेच इअर इंडिया कंपनी न विकण्याचे मोठे कारण ठरले.

प्रति महिना पगारावर खर्च होतात ३०० कोटी रुपये

एअर इंडिया कंपनीला प्रति महिन्याला ३०० कोटी रुपये कर्मचाऱ्यांना पगाराच्या स्वरूपात द्यावे लागतात. एवढच नाही तर मे महिन्यात कर्मचाऱ्यांचा पगार १० दिवस उशिरा देण्यात आला. या वित्तीय वर्षी एअर इंडिया कंपनी ९००० करोड रुपये कर्ज परतफेड करण्यावर काम करत आहे. या साठी कंपनीने सरकारकडे मदत मागितली आहे. परंतु सरकार कडून याविषयी निराशाच मिळण्याची शक्यता दिसतीय. कारण सरकार या कंपनीची १०० टक्के हिस्सेदारी विकण्याच्या योजनेत आहे.

पुढील वित्तीय वर्षापर्यंत कंपनी ५० टक्के कर्ज टाळू शकते

कंपनीला जे कर्ज भरावे लागणार आहे त्यापैकी अर्धे कर्ज भरण्यासाठी कंपनी पुढील आर्थिक वर्षापर्यंत थांबवण्याच्या प्रयत्नात आहे.

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

You might also like