Air India – Tata Sons | 10 दिवसात टाटांकडे असेल एअर इंडियाची चावी, सरकारने दिला ‘हा’ महत्वाचा संदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Air India – Tata Sons | नागरी विमानन सचिव राजीव बन्सल यांनी म्हटले की, एयर इंडियाची निर्गुंतवणूक (Air India Sale) प्रक्रिया पुढील 10 दिवसात पूर्ण होऊ शकते. तोपर्यंत केवळ आवश्यक महसूल तसेच भांडवली खर्च केले पाहिजेत. बन्सल एयर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुद्धा आहेत. (Air India – Tata Sons) बन्सल यांनी एका आदेशात म्हटले आहे की, एयरलाईनच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आणि टाटा समुहाला इच्छापत्र अगोदर जारी करण्यात आले आहे.

दुसरीकडे टाटा समुहाने (Tata Group) शेयर खरेदी करारानंतर एयर इंडियासह एयरलाईन उद्योगात आपले सर्व होल्डिंग्ज ऑन-बोर्ड करण्यासाठी एक नवीन व्यवसाय व्हर्टिकल बनवण्याची योजना आखली आहे. नवीन व्हर्टिकल एयर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएसएटीएसमध्ये समुहात रुची ठेवेल.
सध्या टाटाची कमी खर्चाची एयरएशिया इंडिया आणि पूर्ण-सेवा एयरलाईन विस्तारामध्ये बहुतांश भागीदारी आहे.

समुहाची अनेक कार्यक्षेत्र आहेत, ज्यापैकी पर्यटन आणि प्रवासमध्ये समुहाची रुची इंडियन हॉटेल्स कंपनी, विस्तारा आणि एयरएशिया इंडियामध्ये आहे.
सूत्रांनुसार, या विशेष कार्यक्षेत्राला एयरलाईन्स आणि हॉटले व्यवसायात विभाजित केले जाईल.

विभाजनाबाबत टाटा समुहाला पाठवण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले नाही.
टाटा सन्सची सहायक कंपनी टॅलेसच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेंतर्गत राष्ट्रीय वाहकासाठी सर्वात जास्त बोली लावणारे म्हणून समारे आल्यानंतर हा विकास महत्वाचा झाला आहे.

 

टॅलेसने एयर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएसएटीएससह एयर इंडियामध्ये केंद्राच्या 100 टक्के इक्विटी भागीदारीसाठी 18,000 कोटी रुपयांचे उद्योग मूल्य ठरवले होते.

18,000 कोटी रुपयापैकी टॅलेस एयर इंडियाचे एकुण 15,300 कोटी रुपयांचे कर्ज कायम राहाणार आहे.
उर्वरित पैसे केंद्राला रोख घटकाच्या रूपात केले जाईल. केंद्राने 12,906 कोटी रुपयांचे आरक्षित मूल्य ठरवले होते.
मागील शुक्रवारी घोषित करण्यात आलेल्या लिलावाच्या निकालाच्या आधारावर केंद्र डिसेंबरच्या अखेरीस टॅलेससोबत एक शेयर खरेदी करार (एसपीए) करेल.

 

Web Title : Air India – Tata Sons | air india tata sons deal can the tatas turn air india around

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Top Indian IT Companies | टॅलेंट हायर करण्याची स्पर्धा, IT कंपन्या 1 लाखापेक्षा जास्त फ्रेशर्सला देणार नोकरी

Shivsena Dasara Melava | छापा-काटा ! हिंमत असेल तर पाडून दाखवा; CM उद्धव ठाकरेंचे भाजपला ‘आव्हान’

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘मीच मुख्यमंत्री आहे असं वाटत नाही, कारण…’ (व्हिडीओ)