#WomensDay : एअर इंडियाच्या विमानांची धुरा महिलांच्या हाती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने आज (८ मार्च) महिला दिनानिमित्त एक चांगली संकल्पना राबवली आहे. आज दिवसभरात १२ आंतरराष्ट्रीय आणि ४० हुन अधिक देशस्थ विमानांचे वैमानिक म्हणून महिला कार्यरत असणारा आहेत. या निर्णयाच्या बरोबरच विमानात केवळ महिला क्रू मेंबर ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या निर्णयांच्या माध्यमातून महिला शक्तीचा जागर करण्यात येणार आहे.

एअर इंडियाने घेतलेल्या निर्णयामुळे देशात आणि जगात विमानाची धुरा हि महिला वैमानिकांच्या हाती असणार आहे. आम्हाला हा अत्यंत अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण वाटतो. कारण एअर इंडियाच्या माध्यमातून  महिला कर्मचारी आज आपल्या कार्याचा ठसा देशात आणि जगात उमठवणार आहेत असे एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी म्हणले आहे.

या स्त्री सन्मानाच्या निर्णयामुळे एअर इंडियाच्या दिल्ली-सिडनी, मुंबई-लंडन, दिल्ली-रोम, दिल्ली-लंडन, मुंबई-दिल्ली-शांघाई, दिल्ली-पॅरिस, मुंबई-नेवार्क, मुंबई-न्यूयॉर्क, दिल्ली-न्यूयॉर्क, दिल्ली-वॉशिंग्टन, दिल्ली-शिकागो आणि दिल्ली-सॅनफ्रान्सिस्को आदी विमान सेवांचे वैमानिक या महिला असणारा आहेत.

यापूर्वी नोव्हेंबर १९८५ मध्ये एअर इंडियाने असाच एक स्त्री सन्मानाचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सर्व महिला कॉकपिट क्रू मेंबर्सने विमान सेवेचे संचलन केले होते. कोलकत्ता ते सिलचर मार्गावर मैत्री फ्लाईटसाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

ह्याही बातम्या वाचा –

#WomensDay : महिलादिनानिमित्त गुगलकडून ‘ती’चा खास सन्मान

पुण्याच्या ग्राहकाकडून बारबालाच्या अपहरणाचा प्रयत्न