एअर इंडियाची सेवा सर्वाधिक ‘अकार्यक्षम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आर्थिक विवंचनेत अडकलेल्या एअर इंडियाची सेवा सर्वाधिक अकार्यक्षम असल्याचे प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवरुन दिसून येत आहे. हवाई प्रवासांतील त्रुटींबाबत महिन्याभरात ७५० प्रवाशांनी तक्रारी नोंदविल्या होत्या. त्यापैकी तब्बल २७८ तक्रारी या एअर इंडियाच्या सेवेबाबत आहेत. ७५० तक्रारींपैकी ६२६ तक्रारींचे निरसन झाले आहे तर १२४ तक्रारी प्रलंबित आहेत. त्या सर्व एअर इंडियाविषयीच्या तक्रारी प्रलंबित आहेत. त्याचे प्रमाण दर १० हजार प्रवाशांमागे ०.६२ इतके आहे.

उड्डाण रद्द झाल्याचा फटका १९ हजार ९७३ प्रवाशांना बसला. त्यांना पुरविलेल्या सुविधांपोटी ५४ लाख ५५ हजार रुपये खर्च करण्यात आले. विमानांच्या उड्डाणाला विलंब झाल्याचा फटका २ लाख ८ हजार ८९२ प्रवाशांना बसला. त्यांना पुरविलेल्या सुविधांवर १ कोटी ९७ लाख ७६ हजार रुपये खर्च केले.
उड्डाण रद्द झाल्याचा सर्वाधिक फटका एअर इंडियाच्या ९ हजार ३२४ प्रवाशांना बसला. त्यांना परतावा, हॉटेलमध्ये वास्तव्य यासह इतर सुविधांवर २२ लाख रुपये खर्च झाले.

इंडिगोच्या सेवेबाबत २७५ तक्रारी आल्या आहेत. स्पाइसजेटबाबत ११४ तक्रारी आल्या आहेत. गो एअर बाबत ६० तक्रारी, एअर एशिया व विस्तारच्या प्रत्येकी १०, जेटच्या ३ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –