तस्करांची नामी युक्ती ! मिक्सर, टॉय कार,ईमरजेन्सी लॅम्पमधून सोन्याची ‘तस्करी’

कालिकत : परदेशातून सोन्याची तस्करी करण्यासाठी कालीकत विमानतळ आता तस्करांसाठी एक मोठे हब झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर आता वेगवेगळ्या युक्त्या वापरु लागले आहेत. कालिकत एअरपोर्टच्या एअर इंटेलिजेन्स युनिटने (Air Intelligence Unit) रविवारी रात्री ८० लाख रुपयांचे १ किलो ५८८ ग्रॅम सोने जप्त केले आहे.

 

 

तस्करांनी मिक्सर ग्रॅन्डरमधील मोटारमध्ये एक पार्ट १ किलो सोन्यामध्ये बनविला गेला होता. ईमरजेन्सी लॅम्पमधून १५ लाख रुपयांचे २९९ ग्रॅम आणि खेळण्यातील कारमधून २८९ ग्रॅम सोने लपवून आणले जात होते़.

या वर्षाच्या सुरुवातीलाच कालिकत विमानतळावर १़३२ कोटी रुपयांचे २ किलो ५९६ ग्रॅम सोने जप्त केले होते. ८ ऑक्टोंबर २०२० रोजी शारजा येथून आलेल्या दोन प्रवाशांकडून २ किलो ३३३ ग्रॅम सोने जप्त केले होते. त्याच विमानातून अंर्तवस्त्रांमधून १ किलो ६७३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते. दुबईहून आलेल्या २ प्रवाशांकडून ३ किलो ७०१ ग्रॅम सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली होती. अशा प्रकारे एकाच दिवशी १ कोटी ६५ लाख रुपयांचे ६ किलो सोने जप्त करण्यात आले होते.