एअर मार्शल आरकेएस भदोरिया होणार वायूसेना प्रमुख, त्यांनी उडवलंय ‘राफेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय वायू सेना दलाचे एअर व्हाईस चीफ मार्शल आर.के.एस भदोरिया यांना सरकारने वायू सेना प्रमुख म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य प्रवक्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार देशाचे नवीन वायू सेना प्रमुख आर.के.एस भदोरिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आर.के.एस भदोरिया हे एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांची जागा घेणार आहेत. बी.एस. धनोआ हे येत्या ३० सप्टेंबर रोजी भारतीय वायू सेनेतून सेवानिवृत्त होत आहेत.

वायू सेना दलाचे एक तरबेज पायलट
एअर वाइस चीफ मार्शल आर.के.एस भदोरिया हे भारतीय वायू सेना दलाचे एक तरबेज पायलट मानले जातात. यांनी आत्तापर्यंत २६ प्रकारचे लढाऊ आणि वाहतूक विमाने उडवली आहेत. यामध्ये राफेलचा देखील समावेश आहे. ते राफेल या लढाऊ विमान खरेदी करणाऱ्या टीमचे चेअरमन देखील राहिले आहेत.

राफेल मुळे भारतीय वायू सेना दलाची ताकत वाढली
राफेल विमान उडवल्यानंतर भदोरिया म्हणाले होते की, राफेल हे लढाऊ विमान जगभरातील एक सर्वक्षेष्ठ विमान आहे. याचा भारतीय वायू सेना दलामध्ये समावेश झाल्यामुळे सेनेची ताकत कित्येक पटींनी वाढली असल्याचा त्यांनी निर्वाळा दिला होता.

सुखोई आणि राफेल मुळे नापाक कारवायांना बसणार चाप
सुखोई आणि राफेल या दोन्ही लढाऊ विमानांमुळे पुढे चालून पाकिस्तान आणि चीन भारताच्या विरोधात नापाक हरकती करू शकणार नाहीत. एअर व्हाईस चीफ मार्शल भदोरिया प्रायोगिक टेस्ट पायलट असण्यासोबतच कैट ‘ए’ कॅटेगरी चे प्रशिक्षित फ्लाइंग इंस्ट्रक्टर आणि पायलट अटॅक इंस्ट्रक्टर सुद्धा आहेत. आर के एस भदोरिया हे वायू सेना पदक , अतिविशिष्ट सेवा मेडल (AVSM ) आणि परम विशिष्ट सेवा मेडल (PVSM ) ने सम्मानित आहेत.

Visit – policenama.com