Air Marshal V. R.Choudhary | ‘एअर मार्शल व्ही. आर. चौधरी’ होणार भारताचे नवे वायूदल प्रमुख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Air Marshal V. R.Choudhary | भारताचे नवनियुक्त वायुदल प्रमुख म्हणून एअर मार्शल व्ही. आर. चौधरी (Air Marshal V. R.Choudhary) यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे. सध्याचे असणारे वायुुदल प्रमुख (Air Chief) आर.केएस भदौरिया हे लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या पदावर व्ही. आर. चौधरी यांची वर्णी करण्यात आली आहे. चौधरी हे सध्या उप वायूदल प्रमुख आहेत. भदौरिया हे निवृत्त होण्यापुर्वीच नियमांनुसांर केंद्र सरकारने (Central Government) भारताचे नवनियुक्त वायुदल प्रमुख म्हणून व्ही. आर. चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

सध्याचे वायूदल प्रमुख आर.केएस भदौरिया (Air Chief RKS Bhadoriya) हे 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर एअर मार्शल व्ही. आर. चौधरी या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि संरक्षण सेवा स्टाफ कॉलेज, वेलिंगटनचे माजी विद्यार्थी आहेत. उप वायूदल प्रमुख होण्याआगोदरच त्यांनी पश्चिमी वायूदलात एअर ऑफिसर कमांड-इन-चीफ या पदाची जबाबदारी देखील सांभाळली होती.

एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांची यंदाच्या वर्षी म्हणजेच 1 जुलै रोजी उप वायूदल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. एअर मार्शल चौधरी हे 29 डिसेंबर 1982 मध्ये वायूदलात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी सातत्यपूर्ण आणि अभिमानास्पद कामगिरी करत आपल्या कर्तृत्वाचा आलेख चढता ठेवला आहे. तर, आतापर्यंत एअर मार्शल चौधरी यांच्या नावे तब्बल 3800 तासांपेक्षा जादा विमान उड्डाणाचा अनुभव आहे. एवढा प्रदीर्घ विमान उड्डाणाचा अनुभव त्यांना आहे.

Web Title : Air Marshal V. R.Choudhary | air marshal vr choudhary to become new chief of air staff declares modi government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MHD Admit Card 2021 | महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीसाठी प्रवेशपत्र जारी; असं करा डाउनलोड प्रवेशपत्र

Pune Amenity Space | ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या प्रस्तावावरून भाजपचा ‘यु टर्न’ ! महापौर मोहोळ यांची विषयात पहिल्यांदाच ‘एन्ट्री’

Vidyadhar Karmarkar | ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’.. विद्याधर करमरकर यांचे निधन