‘हे’ देखील लठ्ठपणाचं मोठं कारण ! सगळेच करतात दुलर्क्ष

पोलीसनामा ऑनलाइन – आजकाल सर्वांनाच वाटतं की, आपण फिट राहावं. परंतु बदलत्या लाईफस्टाईलमुळं अनेक लोक लठ्ठपणाची शिकार होत आहेत. तुमच्या लठ्ठपणाचं एक कारण वायू प्रदूषण देखील आहे. याचबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

वायु प्रदूषण आव्हान
वायु प्रदूषणाचा केवळ हवेवरच नाही तर लोकांच्या आरोग्यावरही प्रभाव पडत असतो. लोक वेगवेगळ्या आजारांची शिकार होत आहेत. लठ्ठपणा वाढण्याचं हेही एक कारण आहे. वायु प्रदूषणामुळं यातील विषारी कण श्वासांद्वारे शरीरात जातात. यामुळं हे बॅक्टेरिया शरीरातील गुड बॅक्टेरियांना नष्ट करतात. यामुळं याचा आरोग्यावर परिणाम होतो.

वायु प्रदूषणामुळं कसं वाढतं वजन ?
वायु प्रदूषणातील विषारी कण शरीरातील गुड बॅक्टेरियांना नष्ट करतात. यामुळं याचा आरोग्यावर परिणाम होतो. परिणामी आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळं शरीरातील इंसुलिन कंट्रोलमध्ये ठेवण्याची आणि फॅट बर्न करण्याची आपली क्षमताही कमी होते. हेच कारण आहे की, आपल्याला वेवगेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. यात डायबिटीस आणि लठ्ठपणा अशा आजारांचा समावेश आहे.

अशी घ्या काळजी
प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या
होत असलेल्या वायू प्रदूषणापासून बचाव करा.
प्रदूषण कमी असेल अशा ठिकाणी रहा.
घरातील वायू प्रदूषण जसं की, स्मोकिंग, जास्त तेल मसाले खाणं यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता.
सकाळी वॉकिंग करा
नियमित व्यायाम करा.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.