श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वातावरणातील धुळीमुळे अनेकांना श्वसनाचे आजार जडतात. प्रदूषण आणि खराब जीवन शैलीमुळे ही समस्या होते. सध्या श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या जलदगतीने वाढत आहे. भारतात फुप्फुसांच्या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. जगभरातील दम्याच्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण हे भारतातील आहेत, अशी आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केली आहे. यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय कोणते त्याची माहीती आपण येथे करून घेणार आहोत. ओव्याच्या पानांमधील अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी फुप्फुसाची स्वच्छता करते. यामुळे दमा, सायनोसायटिस आणि खोकल्याची समस्या दूर होते. तसेच लसणामध्ये अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. यामुळे घसा आणि फुप्फुसातील बॅक्टेरिया नष्ट होतो. तसेच श्वसनाच्या आजारांवर ताबा ठेवता येतो.

दररोजच्या आहारामध्ये आल्याच्या रसाचा वापर केल्यास श्वसनाचे आजार दूर राहतात. चहामध्ये आल्याचे प्रमाण वाढवावे. यामधील अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टी श्वसनाच्या आजारांपासून बचाव करते. तसेच पेपरमिंटमध्ये मेंथॉल, कॉपर, व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. याचा वापर केल्याने श्वसनाच्या आजारावर नियंत्रण राहते. दिवसातून दोन वेळा दररोज तुळशीचा चहा घ्या. यामधील अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टीज श्वसनाच्या आजारांपासून बचाव करतात.

आरोग्य विषयक वृत्त –

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत

काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी

You might also like