भारतात 114 वर्षांपूर्वीच सुरु झाली होती वायू प्रदूषणाविरोधात लढाई, 1905 मध्ये बनला होता पहिला कायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वायू प्रदूषणाविरोधात देशाने 114 वर्षांपूर्वीच लढाई सुरु केली होती. मात्र अद्याप तरी याबाबत काही फरक पडलेला दिसत नाही. 1905 मध्ये बंगालमध्ये पहिल्यांदा बंगाल स्मोक न्यूसेंस अॅक्ट हा कायदा बनवण्यात आला होता. त्यानंतर अनेक भागात यासंबंधी कायदे बनवण्यात आले. त्यानंतर ऐशीच्या दशकात याचे गांभीर्य लक्षात यायला लागले.

नागपूर येथील सीएसआर येथिल एका प्रयोगशाळेने बुधवारी एक पोर्टल लॉंच केले. यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की, 1905 मध्ये पहिल्यांदा इंग्रजांनी वायू प्रदूषणावर कायदा बनवला आहे. त्यावेळी कारखान्यांद्वारे प्रदूषण करणाऱ्यावर या कायदयानुसार दोन हजारांचा दंड आकारला जात होता. तसेच पुन्हा तीच चूक केल्यास दुसऱ्यांदा पाच हजार इतका दंड भरावा लागत असे त्या काळातही सर्वात कडक कायदा हाच होता. तसेच या नंतरच्या काळात अनेक कायदे करण्यात आले होते या बाबतची माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे. संशोधकांसाठी हे पोर्टल खूप महत्वाचे आहे.

स्वातंत्र्यानंतर कडक धोरणाला खीळ –

डॉ. राकेश कुमार सांगतात की, स्वातंत्र्याआधी वायू प्रदूषणावर बनलेल्या कायद्याचे पालन झाले तितके स्वातंत्र्यानंतर होऊ शकले नाही. 1913 मध्ये बॉंबे स्मोक कायदा बनवण्यात आला. 1963 मध्ये गुजरात स्मोक न्यूसेंस हा कायदा बनवून अहमदाबादच्या आसपास लागू देखील करण्यात आला होता.

खासदारांची मागणीच पूर्ण झाली नाही –

या पोर्टल वर दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यानंतर 1972 मध्ये संसदेत जल प्रदूषणावर कायदा केला जात असताना खासदारांनी वायू प्रदूषणावर देखील कायदा करण्याची मागणी केली होती. परंतु त्या वेळी ही मागणी पूर्ण केली गेली नाही. त्यानंतर तब्बल बारा वर्षानंतर 1982 साली वायू प्रदूषणावर कायदा करण्यात आला.

Visit : Policenama.com