Air Pollution : तुम्ही सुद्धा करत नाही ना उघड्यावर एक्सरसाईज, आरोग्याचे होऊ शकते नुकसान

 पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या आरोग्यासाठी एक्सरसाईज करणे खुप लाभदायक आहे. बहुतांश लोक घरापेक्षा बाहेर खुल्या हवेत उघड्यावर एक्सरसाईज करणे पसंत करतात. मात्र, अनेक स्टडीमध्ये म्हटले आहे की, बाहेर एक्सरसाईज केल्याने आपण फ्रेश राहातो, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहाते. लोक बाहेर एक्सरसाईज केल्याने जास्त दिवसांपर्यंत आपले रूटीन फॉलो करतात. परंतु, जेव्हा बाहेरची हवा प्रदुषित असेल आणि फुफ्फुसांचे नुकसान करत असेल, अशा स्थितीत बाहेर एक्सरसाईज करणे योग्य नाही.

चांगल्या क्वालिटीचा मास्क वापरूनही प्रदूषित हवेचे कण फुफ्फुसात पोहचतात. वायु प्रदूषणामुळे अस्थमा आणि फुफ्फुसाशी संबंधित समस्या होतात. इतकेच नव्हे, जास्त काळ प्रदुषित हवेत श्वास घेतल्याने डोकेदुखी, डोळे आणि गळ्यात जळजळ होणे, अशा समस्या होतात. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका सुद्धा वाढतो.

प्रदुषित हवेत श्वास घेणे हानिकारक
आपण बाहेर जास्तकरून एरोबिक एक्सरसाईज जसे की, रनिंग, वेगाने चालणे आणि सायकलिंग करतो. या दरम्यान वेगाने श्वास घेतो आणि आपल्याला जास्त ऑक्सीजनची आवश्यकता असते. यासाठी आपण नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतो, आणि अशावेळी तोंडात जास्त प्रदुषित तत्व जातात.

हिवाळ्यात काय करावे
जर बाहेर हवेची गुणवत्ता खराब असेल तर घरात एक्सरसाईज करा. बाहेर विषारी हवा असेल तर आत सद्धा सावधगिरी बाळगा. मुले आणि ज्येष्ठांची विेशेष काळजी घ्या. घरात योगा, स्किपिंग आणि स्पॉट जॉगिंग करू शकता.