‘स्वस्त’ होणार ‘हवाई’ सफर ! विमानाच्या इंधन दरात ‘कपात’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलग दोन महिने विमानाच्या इंधनाची दरवाढ होत असून फेब्रुवारी महिन्यामध्ये विमानाच्या इंधनाच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. विमानाच्या इंधनाच्या किंमतीमध्ये तीन टक्क्यांनी घट झाली आहे. या महिन्यात विमानाच्या इंधनाच्या दरात कपात केल्याने देशातील विमानांच्या इंधनाच्या वेगवेगळ्या शहरातील किंमतीमध्ये मोठा फरक आहे. चेन्नईमध्ये केवळ 0.02 टक्क्यांनी इंधन स्वस्त झाले तर कोलकातामध्ये 3 टक्क्यांनी इंधनाचे दर कमी झाले आहेत.

मुंबईत 2.45 टक्के आणि दिल्लीत 1.36 टक्क्यांनी इंधनाच्या किंमतीमध्ये कपात झाली आहे. चेन्नई, कोलकता, दिल्ली यांच्या पेक्षा मुंबईत इंधनाचे दर स्वस्त झाले आहेत. देशातील सर्वात मोठी कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये दिल्लीत विमानाच्या इंधनाची किंमत 874.13 रुपयांनी घटली असून सध्या हे इंधन 63,449.63 रुपये प्रति किलोलीटर झाले आहे.

कोलकतामध्ये 2,101.13 रुपयांनी स्वस्त झाले असून 68,487.48 रुपये प्रतिकिलो इंधनाचे दर आहेत. मुंबईत 1,580.05 रुपयांनी इंधन स्वस्त झाले असून मुंबईत इंधनाचे दर 62,949.74 रुपये प्रतिकिलो आहेत. तर चेन्नईमध्ये 128.95 रुपयांनी इंधन स्वस्त झाले आहे. चेन्नईमध्ये सध्या इंधनाचे दर 65,491 रुपये प्रतिकिलो दराने विक्री करण्यात येत आहे.