१ जुलैपासून विमान प्रवास महागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रुड तेलाचे भाव घसरले असताना तसेच देशातील इंधनाचे दर कमी होत असताना देशांतर्गत तसेच परदेशी विमान प्रवास मात्र महागणार आहे. कारण नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने उड्डाण सुरक्षा शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे. विमान प्रवाशांकडून प्रवासी सेवा शुल्काऐवजी उड्डाण सुरक्षा शुल्काची आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे परदेशी प्रवाशांबरोबरच देशांतर्गत विमान प्रवास काही प्रमाणात महागणार आहे.

हवाई सुरक्षा शुल्कात १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. हे शुल्क पूर्वी १३० रुपये होते. ते आता १५० रुपये करण्यात येणार आहे. तर परदेशी प्रवाशांना आता ३.२५ डॉलरऐवजी ४.८५ डॉलर्स शुल्क द्यावे लागणार आहे. ही दरवाढ १ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांनी लागू होईल.

आरोग्यविषयक वृत्त –

औरंगाबादेतील कॅन्सर हॉस्पिटलची क्षमता वाढणार ; १०० खाटांचे रुग्णालय २६५ खाटांचे

दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम

दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा

महिन्यात पुन्हा एकदा मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय