पावसामुळं शिर्डीतील विमानसेवा विस्कळीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पावसामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने शिर्डीतील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. काल शिर्डीला येत असलेली चार विमाने लँडिंग न करताच परतली. काहींची उड्डाणे रद्द करण्यात आली. हवामानामुळे शिर्डीतील विमानसेवा विस्कळीत झाली आहे.

काल भोपाळ, दिल्ली, बंगलोर आणि मुंबई आदी विमानाचे लँडींग न होताच परत गेली. संध्याकाळी दिल्ली येथून आलेल्या विमानाचे शिर्डीत लँडींग झाले, परंतु टेकऑफसाठी हवामान चांगले नसल्याने या विमानाचेही उड्डाण रद्द करण्यात आले. १८० प्रवासी घेऊन दिल्लीच्या दिशेने टेकऑफ करण्याच्या तयारीत असताना उड्डाणासाठी व्हीजीबीलीटी मिळत नसल्याने दिल्लीला जाणाऱ्या या विमानाचेही टेकऑफ रद्द झाले आहे.

प्रवाशांची विमान कंपन्यांनी शिर्डीत राहण्याची व्यवस्था केली आहे. आज टेकऑफसाठी व्हीजीबीलीटी मिळताच दिल्लीचे विमान उडेल. दिल्ली, भोपाळ, बंगलोर आणि मुंबई येथे जाण्यासाठी चारशेच्यावर प्रवाशांनी आपली तिकिटे बुक केलेली होती. मात्र खराब हवामानाचा फटका बसल्याने ही विमाने शिर्डीत न उतरता परत गेली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामात भ्र्ष्टाचार ,सभापतींचे चौकशीचे आदेश

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार