धक्कादायक ! ‘लॅन्डींग’ करताना ‘कोरोना’मुळं एअरपोर्ट बंद असल्याचं समजलं, पुढ झालं ‘असं’ काही

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउननंतर आता निर्बंध शिथिल करत सेवा सुरु केल्या जात आहे. अनेक देशांमध्ये विमानसेवाही सुरु करण्यात आल्या आहेत. नवे नियम आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून घेण्यात येणार्‍या खबरदारीमुळे विमानतळांवरील चित्र अगदीच वेगळे दिसत आहे. मात्र याच सार्‍यामध्ये जर्मनीच्या युरोविंग या विमान कंपनीने एक विचित्र गोंधळ घातल्याची माहिती उघड झाली आहे.

युरोविंगने शनिवारपासून सेवा सुरु केली आहे. शनिवारी इटलीच्या डसेलडोर्फहून सार्डिनियासाठी विमान झेपावले होते. मात्र काही तासांनंतर या विमानाला इच्छित विमानतळावर उतरण्याची परवानगीच नाकरण्यात आली. हे विमान ऑल्बिया विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. मात्र ऑल्बिया विमानतळावरील सेवा अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळेच अगदी विमानतळाजवळ पोहचून या विमानाला परत फिरावे लागले. 23 मे रोजी सकाळी सार्डिनियामधील ऑल्बियाला जाण्यासाठी युरोविंगचे इडब्लू 9844 हे विमान आकाशात झेपावले.

1 हजार 170 किमीचा प्रवास करुन हे विमान सार्डिनियन हवाई क्षेत्रामध्ये शिरले होते. त्यावेळी तेथील हवाई नियंत्रण कक्षाने ऑल्बिया विमानतळ अद्यापही बंद असल्याचे वैमानिकांना कळवले. विमानाने उड्डाण करण्याआधी यासंदर्भातील माहिती सार्डिनियन हवाई नियंत्रण कक्षाला देण्यात आली नसल्याची माहिती नंतर उघड झाली. त्यामुळेच अगली लॅण्डींगच्या तयारीत असणार्‍या विमानाला परवानगीसाठी वाट पाहत हवेमध्ये बर्‍याच काळ घिरट्या घालाव्या लागल्या.एअरबस ए 320 प्रकारचे हे विमान बराच वेळ आकाशामध्ये घिरट्या घालत होते. या विमानाने ऑल्बिया विमानतळावर उतरण्याची परवानगी मागितली त्यानंतर या विमानाला 193 किमी दूर असणार्‍या कॅग्लियारी विमानतळावर उतरवण्यात आले.