शेखचिल्‍ली ! पाकिस्तानच्या 82 विमानांचं एकही प्रवाशी नसताना ‘टेकऑफ’, झालं 18 कोटींचं नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या चांगलीच डबघाईला आलेली आहे. अशातच पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर येतीय पाकिस्तानातील विमान सेवा ही अनेक दिवसांपासून बिना प्रवाशांचे विमान उडवत आहे. पीआयई च्या विमानाने एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 82 वेळा कोणत्याही प्रवाश्याशिवाय उड्डाण केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय विमान सेवा ने इस्लामाबादमधून उड्डाण केले आणि प्रवाशी नसल्यामुळे पुन्हा इस्लामाबाद विमानतळावरच लँडिंग केले. रिमिळालेल्या माहितीनुसार, 2016 ते 2017 मध्ये पीआईए ने अशा 46 उड्डाणे केली आहेत, ज्यात एकसुद्धा प्रवासी नव्हता आश्चर्याचे म्हणजे की येथील हजला जाणारी विमाने देखील बिना प्रवाश्यांची जात असल्याचं समजतंय .यामुळे पीआईए ला 18 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झालेले आहे. याबाबतची माहिती प्रशासनाला देताच या बाबतची चौकशी प्रशासनाने सुरु केली आहे.

पाकिस्तानचे कर्ज सहा अरब डॉलर पर्यंत पोहचले आहे. पाकिस्तानवरील कर्जामुळे पाकिस्तानच्या फॉरेन एक्सचेंज रिजर्व आणि चालू खाते सुद्धा डबघाईला आले आहे. कर्जामुळेच देशाची इतकी वाईट अवस्था झाली आहे.

पाकिस्तानची परिस्थिती आर्थिक दृष्टीने दुर्बल होत चालली आहे मोठ्या आर्थिक कमजोरीमुळे पाकिस्तानच्या केंद्रीय बँकांनी व्याजदर 7.50 % वाढवला आहे त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अजून नाजूक होत चालली आहे.

 

visit : Policenama.com