Airtel च्या ‘या’ शानदार प्लॅन मध्ये मिळणार ‘जीवन विमा कव्हर’, करू शकाल ‘अनलिमिटेड’ कॉल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी Airtel ने या वर्षी ग्राहकांना फायदा देण्यासाठी काही खास ऑफर आणली आहे. या ऑफरच्या अंतर्गत यूजर्सला 279 रुपयांच्या प्लॅनवर चार लाख रुपयांचा लाइफ इंश्योरेन्स कवर म्हणजेच जीवन विमा संरक्षण कवच मिळेल. याशिवाय कंपनी यूजर्सला या अंतर्गत इंटरनेट डाटा आणि कॉलिंगची सुविधा देखील देईल. कंपनीने प्लॅनच्या किंमती वाढवण्यापूर्वी देखील 249 आणि 599 रुपयांच्या प्लॅनवर इंशोरेन्स कवर ग्राहकांना उपलब्ध करुन दिले होते.

काही दिवसांपूर्वी एअरटेलने 279 बरोबरच 379 रुपयांचा प्लॅन बाजारात आणला होत्या ज्याला ग्राहकांकडून मोठी पसंती मिळाली होती. एअरटेलच्या या प्लॅनमुळे वोडाफोन – आयडिया आणि रिलायन्स जिओ सारख्या कंपन्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

279 रुपयांच्या प्लॅन –
या प्लॅनमध्ये प्रतिदिन 1.5 जीबी डाटा आणि 100 एसएमएसची सुविधा मिळेल. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळेल. याशिवाय विशेष ऑफर अंतर्गत ग्राहकांना चार लाख रुपयांचे लाइफ इंश्योरेन्स कवर (एचडीएफसी) तसेच विंक म्यूझिक आणि एअरट्रेल एक्सट्रीमचे सब्सक्रिप्शन देखील मिळेल. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

379 रुपयांचा प्लॅन –
यात ग्राहकांना 6 जीबी डाटा, 900 एसएमएसची सुविधा मिळेल. तसेच नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करु शकाल. याशिवाय कंपनी ग्राहकांना विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्सट्रीमचे मोफत सब्सक्रिप्शन देईल. या प्लॅनची वैधता 84 दिवस असेल.

जिओच्या या प्लॅनला टक्कर –
रिलायन्स जिओचा 199 रुपयांच्या प्लॅनला एअरटेलच्या प्लॅनमुळे मोठी टक्कर मिळाली आहे. ऑफरचा विचार केला तर या प्लॅनमध्ये 1.5 जीबी डाटा मिळेल. तसेच यूजर्सला जिओ टू जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग असेल, परंतु इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी ग्राहकांना आययूसी शुल्क द्यावे लागेल. प्लॅनची वैधता 28 दिवस असेल.

रिलायन्स जिओने यूजर्सला फायदा देण्यासाठी 329 रुपयांचा प्लॅन बाजारात आणला होता. ज्यात ग्राहकांना 6 जीबी डाटाबरोबर 100 एसएमएसची सुविधा मिळेल. तसेच यूजर्सला जिओ टू जिओ कॉलिंगवर अनलिमिटेड कॉलिंग असेल. इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 एफयूपी मिनिट मिळतील. तर प्लॅनची वैधता 84 दिवस असेल.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/