फायद्याची गोष्ट ! आता Airtel च्या ‘या’ ग्राहकांना सुद्धा मिळणार 3 स्वस्त प्रीपेड प्लॅनचा फायदा, किंमत फक्त 99 रुपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  एयरटेलने काही दिवसांपूर्वी आपल्या यूजर्ससाठी छोटे-छोटे तीन प्लॅन लाँच केले होते. यामध्ये एक प्लॅन 99 रुपयांचा, दूसरा 129 रुपयांचा आणि तिसरा 199 रुपयांचा आहे. हे प्लॅन लॉकडाऊन दरम्यान घरातून काम करणार्‍यांच विचार करून लाँच केले होते. त्यावेळी हे प्लॅन फक्त कोलकाता, वेस्ट बंगाल, राजस्थान, युपी ईस्ट, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये लाँच केले होते. परंतु, आता हे प्लॅन उर्वरित सर्कलमध्ये सुद्धा सादर करण्यात आले आहेत.

एयरटेलच्या 99 रुपयांचा प्लॅन आता बिहार, झारखंड आणि ओडिसाच्या ग्राहकांनासुद्धा वापरात येईल. तर एयरटेल 129 आणि 199 रुपयांचा प्लॅन दिल्ली-एनसीआर, आसाम, बिहार, झारखंड, मुंबई, नॉर्थ ईस्ट आणि ओडिसाच्या ग्राहकांसाठी सुद्धा उपलब्ध करण्यात आला आहे.

एयरटेल 99 रुपयांचा प्लॅन

एयरटेलचा 99 रुपयांचा प्लॅन प्रीपेड यूजर्ससाठी आहे. यामध्ये एकुण 1जीबी डेटा मिळतो. सोबतच सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा आहे. तसेच यामध्ये 100 एसएमएस फ्री मिळतात. प्लॅनची वॅलिडिटी 18 दिवसांची आहे. अन्य फायद्यांमध्ये ग्राहकांना झी5, विंक म्युझिक आणि एयरटेल एक्सट्रीम सारख्या सेवांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

एयरटेल 129 रुपयांचा प्लॅन

एयरटेलच्या 129 रुपयांच्या प्लॅनची वॅलिडिटी 24 दिवसांची आहे, यामध्ये यूजर्सला प्रत्येक दिवशी 300 एसएमएस फ्री मिळतात. सोबतच टोटल 1 जीबी डेटा आणि झी5, विंक म्युझिक आणि एयरटेल एक्सट्रीम सारख्या सेवांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

एयरटेल 199 रुपयांचा प्लॅन

एयरटेलच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळतो. ज्याची वॅलिडिटी 24 दिवसांची आहे. यामध्ये 100 एसएमएस फ्री मिळतात. सोबतच झी5, विंक म्युझिक आणि एयरटेल एक्सट्रीम सारख्या सेवांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like