जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी एयरटेलने लाँच केला आकर्षक प्लॅन, मिळवा इतक्या महिन्यापर्यंत आता सर्वकाही ‘फ्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एयरटेल आणि रिलायन्स जिओ Reliance Jio लागोपाठ प्रीपेड रिचार्ज प्लान सादर करत आले आहेत, मागील काही दिवसात जिओ कंपनीने आपला नवीन 447 रुपयांचा फ्रीडम प्लॅन लाँच केला होता. ज्यामध्ये डेटा लिमिट नाही. तर दुसरीकडे भारती एयरटेल कंपनीने Bharti Airtel Company ग्राहकांना खुश करण्यासाठी नुकताच एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. जिओप्रमाणे एयरटेलच्या या प्लॅनमध्ये कोणतेही लिमिट नाही, नव्या प्लॅनची किंमत 456 रुपये आहे. या प्लॅनची टक्कर Reliance Jio च्या 447 रुपयांच्या प्लॅनशी होऊ शकते. या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Airtel चा 456 रुपयांचा प्लॅन
एयरटेलच्या या नव्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना Customer 60 दिवसांच्या वॅलिडिटीसह इंटरनेट Internet वापरण्यासाठी 50 जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजे ग्राहकांना या प्लॅनसोबत डेली डेटा लिमिटची सुविधा दिली जात नाही, म्हणून ग्राहक आपल्या गरजांनुसार डेटाचा वापर 60 दिवसांच्या आत कधीही करू शकता. डेटा संपल्यानंतर यूजर्सला 50 पैसे प्रति मेगाबाईट आणि नॅशनल एसएमएस मेसेजसाठी 1.5 रुपया द्यावे लागतील.

MP Sanjay Raut । फडणवीस 100 आमदार निवडून आणतात; बाळासाहेबांना ते का जमलं नाही? शिवसेना खासदार म्हणाले…

एयरटेल यूजर्स users कोणत्याही नेटवर्कवर कॉल करून अनलिमिटेड बोलू शकतात.
तसेच यामध्ये रोज 100 एसएमएसची सुविधा दिली जात आहे.
एयरटेल चा 456 रुपयांचा नवीन प्लॅन कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे.
इतर लाभात 30 दिवसांसाठी Amazon Prime Video Mobile अ‍ॅडिशनची फ्री ट्रॉयल दिली जात आहे.
तसेच ग्राहकांना HelloTunes, Airtel Xstream Premium आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रीप्शन सुद्धा मिळेल.
इतकेच नव्हे 1 वर्षासाठी फ्री ऑनलाइन कोर्सेस आणि FASTag वर 100 रुपये कॅशबॅक ऑफर दिली जात आहे.

जिओच्या नवीन 447 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50 जीबी डेटा आणि 60 दिवसांची वॅलिडिटी दिली जात आहे. यामध्ये कोणतेही डेटा लिमिट नाही.
जिओ यूजर्सला बोलण्यासाठी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएससह JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity, JioCloud चा फ्री अ‍ॅक्सेससुद्धा मिळत आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : airtel 456 recharge plan compete jio 447 plan know about it

हे देखील वाचा

Dog instructor | राज्यातील पहिल्या महिला डॉग इन्स्ट्रक्टर सुप्रिया किंद्रे यांचा सत्कार

PM Narendra Modi । पीएम मोदींनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कलम 370 नंतर आता कोणता निर्णय ?