airtel ची ‘भन्नाट’ ऑफर ! ‘या’ ग्राहकांना 224 दिवसांकरिता मिळणार दररोज 1.5 GB डाटा एकदम फ्री, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यााठी नेहमीच काही नव्या सेवा देत असतात.  एअरटेलनेही आता प्रिपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी एअरटेल ४जी हॉटस्पॉटमध्ये नवे बदल केले आहेत.  एअरटेल ४जी हॉस्पॉट डिव्हाईस खरेदी करणाऱ्या प्रिपेड ग्राहकांना २२४ दिवसांच्या वैधतेत दररोज १.५ जीबी डेटा मिळणार आहे.  हॉटस्पॉट डिव्हाईसमध्ये सिम अक्टिवेट केल्यापासून तो ग्राहकांना मिळेल. हॉटस्पॉट डिव्हाईस खरेदी करणाऱ्या या पोस्टपेड ग्राहकांना ३९९ रुपये आणि ४९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये कॅरी फॉरवर्डचे नवे फिचर मिळणार आहे.  शिवाय पोस्टपेड ग्राहकांनी कंपनीकडून ४जी हॉटस्पॉट खरेदी केल्यावर एक हजार रुपयांपर्यत कॅशबॅकही देण्यात येणार आहे. पण यासाठी मात्र ग्राहकांना ३९९ रुपये किंवा ४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लानच घ्यावा लागणार आहे.  मात्र ४जी हॉटस्पॉट खरेदी नव्या प्रिपेड ग्राहकांना कॅशबॅकचा कोणताही लाभ मिळणार नाही. पण प्रिपेड ग्राहकांना विनामुल्य डेटा देण्यात येईल. खरेदी करण्यात आलेले एअरटेल डिव्हाईस फक्त डेटाबेस डिव्हाईस असल्याने त्यावरुन कॉल करता येणार नाही.

नव्या डिव्हाईसमध्ये सिम अॅक्टिवेट केल्यावर २२४ दिवसांसाठी तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा दिला जाईल. भारती एअरटेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, नव्या प्रिपेड ग्राहकांना सिम अॅक्टिवेट झाल्यानंतर ४८ तासांच्या आत २२४ दिवसांसाठी या प्लॅनची वैधता असेल. एअरटेल पहिल्यांदा नऊशे नव्व्यानव रुपयांना  ४जी हॉटस्पॉट विकत असे. त्यांनंतर त्याची किंमत वाढून दोन हजार रुपये करण्यात आली. ग्राहकांना हे डिव्हाईस पहिल्यांदा दोन हजार रुपयांत खरेदी करावे लागते. त्यानंतर त्याला ३९९ रुपये किंवा ४९९ रुपयांचा डेटा प्लॅन रिचार्ज करावा  लागतो. अॅक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला इथे तीनशे  रुपयेही द्यावे लागणार आहेत. त्यानंतरच ग्रहकांना एक हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल. हा कॅशबॅक ग्राहकांना भविष्यात बिल भरण्यासाठी पोस्टपेड अकाउंटमधे जमा केला जाईल.

आरोग्यविषयक वृत्त –