Airtel ची जबरदस्त ऑफर ! रिचार्जवर 50 % Cashback

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारती एअरटेलकडून आता युजर्सना प्रीपेड रिचार्जवर कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. ही कॅशबॅक ऑफर केवळ अ‍ॅमेझॉन पे वरून रिचार्ज करणाऱ्यांनाच मिळणार आहे. केवळ अ‍ॅमेझॉन मेंबर्ससाठीच ही ऑफर आहे.

जर तुम्ही अ‍ॅमेझॉन पे च्या मदतीनं एअरटेलच्या प्रीपेड नंबरला रिचार्ज केलं तर 50 टक्के किंवा 40 टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. ही एक लिमिटेड टाईम ऑफर आहे. केवळ 30 ऑक्टोबर पर्यंतच ही ऑफर वैध असणार आहे. याचा फायदा घेण्यासाठी युजर्सला आपल्या अ‍ॅमेझॉन प्राईम अकाऊंटवरुन लॉगइन करावं लागणार आहे. त्यानंतर कॅशबॅक रिवार्ड कलेक्ट करावा लागणार आहे.

…तर या ऑफरचा फायदा मिळणार नाही

युजरला मिळणारा कॅशबॅक रिवार्ड अ‍ॅमेझॉन पे वॉलेटवर दिला जाणार आहे. जर एअरटेल अ‍ॅपवर जाऊन किंवा वेबसाईटवर जाऊन कुणी अमॅझॉन पे युपीआयवरून रिचार्ज केलं तर याचा फायदा मिळणार नाही. 1 ऑक्टोबर ते 30 पर्यंतच याचा लाभ घेता येणार आहे. कॅशबॅकची अमाऊंट ही रिचार्ज केल्यानंतर 3 दिवसात युजरच्या अकाऊंटवर क्रेडिट होईल.

कोणताही वेगळा प्रोमो कोड नाही

एअरटेल प्रीपेड युजर्सला मिळत असलेल्या या ऑफरसाठी कोणताही वेगळा प्रोमो कोड असणार नाही. केवळ अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबर्सलाच याचा फायदा मिळणार आहे. तेच केवळ रिवार्ड कलेक्ट करू शकतील. वेबसाईटवर टर्म्स अँड कंडिशन दिल्या आहेत.