Airtel च्या ग्राहकांना याच महिन्यापासून मिळणार 5G सेवा

0
355
Airtel airtel to roll out 5g services this month targets to connect every city by the year 2024 echarge packs possible to increase gopal vittal arpu
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Airtel | स्पेक्ट्रम लिलावानंतर 5G सेवा सुरू करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. एअरटेल याच महिन्यापासून देशात 5G सेवा सुरू करत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल यांनी सांगितले की, एअरटेल मार्च 2024 पर्यंत देशातील सर्व प्रमुख शहरांसह ग्रामीण भागांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे. (Airtel)

 

गोपाल विठ्ठल यांनी म्हटले की, ऑगस्ट महिन्यापासूनच 5 जी सेवा सुरू करण्याचे आमचे ध्येय आहे. लवकरच ही सेवा संपूर्ण देशभर पोहोचवली जाईल. मार्च 2024 पर्यंत देशातील प्रत्येक शहर आणि प्रमुख ग्रामीण भागांमध्ये 5 जी सेवा सुरू होतील. देशात सध्या मोबाईल सेवांची किंमत अतिशय कमी आहे. ती वाढवण्याची गरज आहे. (Airtel)

 

गोपाल विठ्ठल म्हणाले, 5 हजार शहरांमध्ये नेटवर्कची योजना आहे.
कंपनीच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी बाब असेल.
स्पेक्ट्रम लिलावात कंपनीने 3.5 गीगाहर्ट्ज आणि 26 गीगाहर्ट्ज बँडमध्ये 19,867.8 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी मिळवण्यासाठी 43,400 कोटी रूपये खर्च केले.

 

विठ्ठल यांनी सांगितले की, स्पर्धक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यम बँड स्पेक्ट्रम्स नाहीत.
जर आमच्याकडे मोठ्या प्रमाणात मध्यम बँड स्पेक्ट्रम नसते, तर 700 मेगाहर्ट्झ बँडमध्ये स्पेक्ट्रम घेण्याशिवाय पर्याय राहिला नसता.
कंपनीकडे 900 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम बँड आहे आणि त्याच्या तुलनेत 700 मेगाहर्ट्झ बँडमध्ये नेटवर्कने कोणतंही अतिरिक्त कव्हरेज मिळत नाही.
सध्या एअरटेलचा एआरपीयू 183 रूपये आहे आणि किंमतीत वाढ होण्यासोबतच तो 200 आणि 300 रूपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

 

Web Title : –  Airtel | airtel to roll out 5g services this month targets to connect every city by the year 2024 echarge packs possible to increase gopal vittal arpu

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा