जिओनंतर आता ‘एअरटेल’ देखील देणार ग्राहकांना ‘ही’ फ्री धमाकेदार ऑफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वच टेलिकॉम कंपन्या सध्या ग्राहक मिळवण्यासाठी वेगवेगळे आकर्षित प्लॅन देत आहेत. असाच प्लॅन जिओनंतर एअरटेलने देखील आपल्या ग्राहकांसाठी एक खास घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, AirtelThanks रिवॉर्ड अंतर्गत ग्राहक Hello Tunes फ्री मध्ये अॅक्टीव करु शकतात. या Hello Tunes ला फ्री मध्ये अॅक्टीव करण्यासाठी Airtel च्या wynkmusic अॅप डाऊनलोड करावे लागेल, कंपनीने सांगितले आहे की, wynkmusic मध्ये 40 मिलियन पेक्षा आधिक गाणी आहेत, ग्राहक त्यातील कोणतेही गाणे Hello Tune म्हणून अॅक्टीव करु शकतात.

Hello Tune बदलण्यासाठी कोणतीही लिमिट नाही –
यातील सर्वात खास बाब कंपनीने सांगितली आहे ती म्हणजे, Hello Tune बदलण्यासाठी कोणतीही लिमिट नसेल. म्हणजेच कितीही वेळा Hello Tune बदलता येऊ शकते. भारतीय टेलिकॉम कंपनी भारती Airtel ने सांगितले की, प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहक आपले फेवरेट गाणे wynk मधून Hello Tune म्हणून सेट करु शकतात.

या आधी airtel ग्राहकांकडून Hello Tune साठी दर महिन्याला 36 रुपये सब्सक्रिप्शन साठी चार्ज लावत असत. मात्र कंपनीने या ऑफरवर एक शर्त ठेवली आहे की या सुविधेचा लाभ तेच ग्राहक घेऊ शकतात जे ग्राहक दर महिन्याला 129 रुपयांपेक्षा आधिकचे रिचार्ज प्लॅन वापरतात.

अशी करा फ्री Hello Tune सेट –
1. Hello Tune अॅक्टीव करण्यासाठी सर्वात आधी Wynkmusic हे अॅप डाऊनलोड करा.
2. यात अॅप खोलल्यानंतर Hello Tunes म्हणून आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.
3. येथून तु्म्ही तुम्हाला आवडणारे गाणे Hello Tune म्हणून सेट करु शकतात.
भारती एअरटेलचे अॅप सीईओ समीर बत्रा यांनी सांगितले की, Hello Tunes एक प्रोडक्ट आहे ज्यातून Airtel मोबाईल कस्टमर्स स्वत:ला एक्सप्रेस करु शकतील. आता Airtel ग्राहक आपले आवडीचे गाणे Wynkmusic वरुन Hello Tune सेट करु शकतात.
आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग