फायद्याची गोष्ट ! Airtel चा नवा प्लॅन, 179 रुपयांमध्ये अनलिमिटेड ‘कॉलिंग’सह 2 लाखाचा ‘विमा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरटेल कंपनीने नुकताच एक 179 रुपयांचा नवीन प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग सोबत भारती अक्सा लाईफ इंश्योरन्सचा दोन लाखांचा विमा देखील दिला जाणार आहे. कंपनीने सांगितले की, 179 रुपयांच्या या नवीन प्रीपेड पॅकच्या माध्यमातून कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दोन जीबी इंटरनेट डेटा, 300 एसएमएस आणि लाईफ इंश्योरन्सचा दोन लाखांचा विमा कव्हर आहे.

28 दिवसांची असेल व्हॅलिडिटी
या पॅकची वैधता 28 दिवसांची असेल. हा प्लॅन विशेषकरून अर्ध शहरी आणि ग्रामीण बाजारातील फीचर फोन वापरणार्‍या ग्राहकांसाठी सादर करण्यात आलेला आहे.

18 ते 54 वर्षाच्या लोकांना मिळणार विमा कव्हर
कंपनीने म्हटले आहे की हे विमा संरक्षण 18 ते 54 वर्षे वयोगटातील लोकांना उपलब्ध असेल. यासाठी कोणतीही कागदपत्रे किंवा वैद्यकीय तपासणी आवश्यक असणार नाही. विमा पॉलिसी किंवा प्रमाणपत्र त्वरित डिजिटल स्वरूपात पाठविले जाईल. तसेच ग्राहकांना याबाबतची प्रतही उपलब्ध करुन दिली जाईल.

कंपनीने म्हंटले आहे की, हा प्लॅन घेणारे ग्राहक जेव्हा या पॅकचा रिचार्ज करतील तेव्हा त्यांना स्वतःला आणि कुटुंबाला आर्थिक मदत देणारा देखील एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा –