19 रुपयांपासून सुरू असलेल्या Airtel च्या सर्वात स्वस्त प्लानमध्ये डेटा आणि कॉलिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम कंपनी Airtel ने ग्राहकांसाठी स्वस्त दरातील नवीन प्लॅन लॉंच केले आहेत. कंपनीच्या पोर्टफोलियोत ग्राहकांसाठी प्रत्येक कॅटेगरीतील प्लान उपलब्ध आहे. एअरटेलकडे स्वस्त प्लान सुद्धा उपलब्ध आहेत. यात डेटा सोबत कॉलिंगचा फायदा मिळतो. या स्वस्त प्लानची सुरुवात 19 रुपयांपासून सुरु होत असून यात अनलिमिटेड कॉलिंगसह इंटरनेटची सुविधा दिली आहे.

Airtel चा 19 रुपयांचा प्लान
एअरटेलच्या वेबसाइटवर हा प्लान टूली अनलिमिटेड कॅटेगरीतील यादीत आहे. 19 रुपयांच्या या प्लानमध्ये देशभरात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. दोन दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये इंटरनेटसाठी कंपनी 200 एमबी डेटा देत आहे. प्लानमध्ये फ्रीमध्ये एसएमएस मिळत नाही.

Airtel चा 49 रुपयांचा प्लान
एअरटेलचा स्मार्ट रिचार्ज 28 दिवसांच्या वैधतेसोबत येतो. 49 रुपयांच्या या प्लानमध्ये कंपनी 38.52 रुपयांचा टॉकटाइम देते. इंटरनेट युजेस साठी या प्लानमध्ये 100 एमबी डेटा ऑफर करते. डेटा लिमिट संपल्यानंतर कंपनी 1 एमबी डेटा साठी 50 पैसे घेतले जातील. या प्लानमध्ये फ्री एसएमएसची सुविधा कंपनी देत नाही.

Airtel चा 79 रुपयांचा प्लान
एअरटेलचा स्मार्ट रिचार्ज 200 एमबी इंटरनेट सोबत येतो. प्लानमध्ये 64 रुपयांचा टॉकटाइम दिला जातो. 28 दिवसांच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी लोकल आणि एसटीडी कॉलिंग साठी प्रति मिनिट 60 पैसै घेतले जातात.