लॉकडाऊन दरम्यान Airtel कडून मोठं ‘गिफ्ट’, 100 रूपयाच्या प्लॅनमध्ये आता मिळणार 15GB इंटरनेट डेटा

पोलिसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन लक्षात घेता भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी दोन स्वस्त आणि फायदेशीर प्लॅन आणले आहेत. कंपनीने अ‍ॅड-ऑन प्लॅन (Add-On Plan) आणले आहेत, जे घरून काम करणाऱ्या ग्राहकांसाठी खूप उपयुक्त आहेत. कंपनीच्या नव्या अ‍ॅड-ऑन प्लॅनची किंमत १०० रुपये आहे, ज्यामध्ये ग्राहकांना १५ जीबीचा लाभ मिळतो. हे खासकरुन जे घरून काम करतात त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल.

माहितीसाठी, हे प्लॅन पोस्टपेड ग्राहकांसाठी आहेत, जे १०० रुपयांपासून सुरू होतात. कंपनीच्या दुसर्‍या प्लॅनची किंमत २०० रुपये आहे, ज्यामध्ये ग्राहकांना ३५ जीबी डेटाचा लाभ दिला जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, युजर्स एअरटेल थँक्स ऍपच्या मॅनेज सर्व्हिसेस सेक्शनमध्ये जाऊन डेटा पॅक ऍक्टिव्ह करू शकतात.

आंध्र प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि तामिळनाडूसारख्या सर्कलमध्ये एअरटेलच्या पोस्टपेड प्लॅनची सुरुवातीची किंमत ३४९ रुपये आहे, ज्यामध्ये ग्राहकांना दररोज अमर्यादित कॉलिंग, ५ जीबी रोलओव्हर आणि १०० मेसेज अशी सुविधा मिळते. याशिवाय झी5 आणि एअरटेल टीव्ही प्रीमियमचेही ऍक्सेस दिला जात आहे.

मिळणार या सुविधा…
दुसरीकडे एअरटेलचा प्रीमियम पोस्टपेड प्लॅन ४९९ रुपयांपासून सुरू होतो. यात युजर्सना ७५ जीबी रोलओव्हर डेटा, अमर्यादित कॉल आणि प्रत्येक १०० एसएमएस दिले जातात. अ‍ॅमेझॉन प्राइम, झी5 आणि एअरटेलस्ट्रिमलाही या योजनेसह सब्सक्रिप्शन मिळेल.