फायद्याची गोष्ट ! Airtel चं ग्राहकांना ‘गिफ्ट’, ‘फ्री’ मध्ये मिळतोय 6GB हायस्पीड डेटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘एअरटेल’ने ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आली आहे. ज्यात युजर्संना तब्बल ६ जीबीपर्यंत डेटा फ्री दिला जात आहे. जुलै महिन्यात ‘फ्री डेटा कूपन’ ऑफरची सुरुवात कंपनीने केली होती. प्रारंभी या ऑफरमध्ये २१९ रुपये, २४९ रुपये, २७९ रुपये, २९८ रुपये, ३४९ रुपये, ३९८ रुपये, ३९९ रुपये, ४४९ रुपये, ५५८ रुपये, ५९८ रुपये आणि ६९८ रुपयांच्या प्रीपेड प्लान्ससाठी ही ऑफर आणली होती. मात्र, आता या ऑफरमध्ये २९८ रुपये, ४४८ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लानचा समावेश करण्यात आला आहे.

फ्री डेटा कूपन अंतर्गत ग्राहकांना १ जीबी डेटाचे कूपन फ्री दिले जाते. काही प्लानमध्ये दोन कूपन मिळतात आणि काही प्लानमध्ये ४ आणि ६ कूपन दिले जातात. या प्रमाणे ग्राहकांना ६ जीबी फ्री डेटा मिळत आहे.

दोन कूपन मिळतात त्यात २१९ रुपये, २४९ रुपये, २७९ रुपये, ३४९ रुपये, ३९८ रुपये, ४४८ रुपयांच्या प्रीपेड प्लानचा समावेश आहे. प्रत्येक कूपनची वैधता ही २८ दिवसांची आहे. ३९९ रुपये, ४४९ रुपये आणि ५५८ रुपयांच्या प्लानसोबत १ जीबी डेटाचे ४ कूपन दिले जाते. तसेच प्रत्येक कूपनची वैधता ५६ दिवसांची आहे. तसेच ५९८ रुपये आणि ६९८ रुपयांच्या प्लानसोबत ६ कूपन मिळतील. याची वैधता ८४-८४ दिवसांची आहे.

४४८ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि रोज ३ जीबी डेटा दिला जातो. यात २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस सोबत रोज २ जीबी डेटा मिळतो. याची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या दोन्ही प्लानमध्ये Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.