Airtel च्या 98 रुपयांच्या पॅकमध्ये मिळतो डबल डेटा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जर आपण एअरटेलचे नेटवर्क वापरत असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरटेलने आपल्या लोकप्रिय 98 रुपयांच्या अॅड-ऑन पॅमध्ये दुप्पट डेटा ऑफर दिली आहे. या योजनेत पूर्वी 6 जीबी डेटा उपलब्ध होता, परंतु आता त्यामध्ये ग्राहकांना 12 जीबी डेटा मिळणार आहे. मात्र या योजनेची वैधता पूर्वीप्रमाणेच 28 दिवसांची असेल.

जिओ आणि व्होडाफोननेही दिले असे पॅक

रिलायन्स जिओ आणि व्होडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी याच प्रकारे डेटा अँड पॅकची ऑफर दिली आहे. रिलायन्स जिओच्या 101 रुपयांच्या अॅड-ऑन पॅकमध्ये 12 जीबी हाय स्पीड डेटा आणि 1000 नॉन-जिओ मिनिटे देण्यात आली आहेत. सध्याची योजना संपेपर्यंत जिओचा हा पॅक वैध राहील.

व्होडाफोन आपल्या ग्राहकांना 98 रुपयात डेटा-ऐड-ऑन पॅक ऑफर देत आहे. व्होडाफोनच्या या योजनेत ग्राहकांना 6 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. या योजनेची वैधता 28 दिवसांची आहे. व्होडाफोनने देखील एअरटेल आणि जिओला टक्कर देण्यासाठी आपल्या अॅड-ऑन प्लॅनमध्ये बदल केलेला नाही.