Airtel नं लॉन्च केलं कोरोनाची लक्षणं तापसणारे टूल, असे करेल ‘काम’

पोलीसनामा ऑनलाईन : भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेलने कोरोनाव्हायरसची लक्षणे शोधण्यासाठी एक टूल लॉन्च केले आहे. हे एक सेल्फ डायग्नोस्टिक टूल आहे, जे वापरकर्त्यांची माहिती घेऊन त्यांच्यात कोविड -१९ ची लक्षणे आहेत की नाही याबाबत सांगेल. दरम्यान, अलीकडेच रिलायन्स जिओने असेच एक टूल लॉन्च केले आहे जे ‘मायजिओ’ अ‍ॅपवर जाऊन वापरता येईल. तसेच हे एअरटेल टूल एअरटेल थँक्स अ‍ॅपमध्ये उपलब्ध असेल. अहवालानुसार हे अ‍ॅप डब्ल्यूएचओ आणि आरोग्य व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केले गेले आहे.

एअरटेलचे हे रिस्क स्कॅनर अ‍ॅप वापरकर्त्याला अनेक प्रश्न विचारते. याद्वारे, संसर्गाची पातळी शोधली जाऊ शकते. जिओच्या अ‍ॅपमध्येही असेच प्रश्न विचारले जातात, जे तुम्ही एन्टर केल्यानंतर त्या आधारे तुम्हाला सांगितले जातील. दरम्यान, जिओ किंवा एअरटेलचे अ‍ॅप आपल्याला कोरोना व्हायरस झाला आहे याची खात्री देऊ शकत नाही. ही साधने केवळ चाचणी करण्यासाठी आपल्याला रुग्णालयात किंवा चाचणी केंद्रात जाण्याची आवश्यकता आहे कि नाही याबाबत सांगते.

दरम्यान, माहितीनुसार, इंट्रा सर्कल रोमिंगसाठी एअरटेल जियो आणि व्होडाफोन सारख्या इतर टेलिकॉम कंपन्यांशी चर्चा करीत आहे. 24 मार्चपासून भारतात 21 दिवसांचे लॉकडाउन केले जात आहे. या परिस्थितीत, इंटरनेटवरील कामांत वेगाने वाढ होत आहे. एअरटेलने सर्व टेलिकॉम कंपन्यांना एकत्र येऊन इंट्रा सर्कल रोमिंग सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. सर्व कंपन्या एकत्रितपणे हे करत असल्यास वापरकर्त्यांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये कमी समस्या उद्भवतील.

तसेच, भारत सरकार CoWin20 नावाच्या अ‍ॅपवर काम करत आहे. कोरोना विषाणूचे रुग्ण आणि त्यांना भेट देणार्‍या लोकांचा मागोवा घेण्यासाठी हे अ‍ॅप तयार केले जात आहे. सिंगापूरने असेच अ‍ॅप सुरू केले आहे. म्हणजेच जगातील कोणताही विकसक हा अ‍ॅप बनवू शकतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like