फायद्याची गोष्ट ! Airtel नं लॉन्च केले ‘हे’ 4 प्लॅन, मिळणार फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारती एअरटेलने भारतात आपल्या यूजर्ससाठी नवे चार इंटरनॅशनल रोमिंग रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हे प्लॅन 648 रुपये, 755 रुपये, 799 रुपये आणि 1,199 रुपये किंमतीचे आहे. या सर्व प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

648 रुपयाच्या प्लॅनमध्ये नो कॉस्ट अनलिमिटेड इनकमिंग कॉल्स आणि लोकल कॉलिंग आणि भारतासाठी 100 मिनिट आऊटगोइंग कॉल्स मिळतील. तसेच यात 500MB फ्री डेटा आणि 100 एसएमएस देखील मिळतील. या प्लॅनची वैधता 1 दिवसांची असेल. हा प्लॅन इजिप्त, फ्रान्स आणि इंडोनेशिया सारख्या देशात लागू होतील.

755 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी फक्त इंटरनेट देईल. या प्लॅनची वैधता 5 दिवसांची असेल ज्यात 1 जीबी डेटा मिळेल. यात कोणतेही कॉलिंग किंवा एसएमएसचे फायदे मिळणार नाहीत. हा प्लॅन मॅक्सिको, नेपाळ आणि न्यूझीलंडसारख्या देशात लागू होईल.

799 रुपयांच्या प्लॅनमध्ये भारतात कॉलिंग, इनकमिंग कॉल्स आणि फ्री लोकल आउटगोइंग कॉल्ससाठी 100 मिनिट मिळेल. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची असेल, हा प्लॅन यूएस, कॅनडा आणि चीन सारख्या देशात लागू होतील.

1,199 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी 30 दिवसांची वैधता देते आणि यात आउटगोइंग कॉल्स आणि इनकमिंग कॉल्ससाठी 100 मिनिट मिळतील. लक्षात ठेवा की हे सर्व प्लॅन्स देशात ॲक्टिव्ह नाहीत. त्यामुळे एअरटेल ग्राहकांना पहिल्यांदा देश निवडावा लागेल आणि त्यानंतर त्यात तुमचा नंबर टाकून उपलब्ध प्लॅन्स पहावे लागतील.

You might also like