Airtel देतंय 1000GB फ्री, ‘हे’ युजर्स घेवू शकतील त्याचा ‘फायदा’, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बर्‍याच कंपन्या युजर्ससाठी वेगवेगळ्या ऑफर आणि सवलती देत आहेत. अशा परिस्थितीत टेलिकॉम कंपनी एअरटेलदेखील हा स्वातंत्र्य दिवस अगदी वेगळ्या आणि खास पद्धतीने साजरा करत आहे. कंपनीने आपल्या युजर्सना १००० जीबी अतिरिक्त डेटा देण्याची घोषणा केली आहे. पण याचा फायदा केवळ Airtel Xstream Fiber ब्रॉडबँड युजर्सच घेऊ शकतात. हे देखील लक्षात ठेवा की, कंपनीची ही ऑफर केवळ नवीन युजर्ससाठी उपलब्ध असेल. या ऑफरबद्दल डिटेल्स जाणून घेऊया…

Airtel Xstream Fiber ब्रॉडबँड युजर्सला मिळणार फायदा
जर तुम्ही Airtel Xstream Fiber ब्रॉडबँड योजना विकत घेत असाल, तर तुम्हाला योजनेसह अतिरिक्त १००० जीबी डेटा सुविधा मिळेल. तर जुन्या ग्राहकांसाठी ही ऑफर उपलब्ध नाही. हे लक्षात घ्या कि ही ऑफर देशभरात लागू होईल म्हणजे देशातील एअरटेलच्या सर्व सर्कलमध्ये तुम्ही Airtel Xstream Fiber ब्रॉडबँड योजनेवर त्याचा फायदा घेऊ शकता. या विनामूल्य डेटाची वैधता ६ महिने आहे.

Airtel Xstream Fiber ब्रॉडबँड योजना
Airtel Xtream Fibre मध्ये युजर्सना १ जीबीपीएससह अल्ट्रा फास्ट ब्रॉडबँड सपोर्ट मिळेल. यात तुम्ही एकाच वेळी एकाधिक डिव्हाइस कनेक्ट करू शकता. १००० जीबी फ्री अतिरिक्त डेटाचा फायदा Airtel Xtream Fibre च्या सुरुवातीच्या ७९९ रुपयांच्या योजनेसह मिळेल. यात युजर्सना अतिरिक्त डेटासह १२ महिन्यांसाठी Amazon Prime मेंबरशिप आणि Wynk Music सपोर्टही मिळेल. याशिवाय Airtel Thanks बेनिफिट्सचा फायदाही घेता येईल.

अलीकडेच एअरटेलने जाहीर केले होते कि Airtel Digital TV ग्राहक, जे Airtel Xstream Fiber कनेक्शन वापरत आहेत, ते १,५०० रुपयांच्या रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉजिटवर Xstream Box मध्ये अपग्रेड करू शकतात. ही ऑफर एसडी तसेच एचडी Airtel Digital TV सेट टॉप बॉक्स वापरकर्त्यांसाठी सादर केली आहे आणि यासाठी वापरकर्त्यांना ४५२ रुपयांचा कंटेंट पॅक खरेदी करणे आवश्यक आहे.