Airtel चा भन्नाट प्लॅन, 4.15 रूपयांमध्ये 1 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच बाजारातील वाढती स्पर्धा या अनुषंगाने टेलिकॉम कंपन्या कमी किंमतीत जास्त बेनिफिट मिळणारे नवीन प्लॅन आणि ऑफर घेऊन येत आहेत. आता एअरेटलने आपल्या ग्राहकांना जबरदस्त प्रीपेड प्लॅन ऑफर केला आहे. त्यामध्ये ४.१५ रुपयांना १ जीबी डेटा मिळत आहे.

एअरेटलच्या ‘या’ प्लॅन मध्ये मिळतोय ४.१५ रुपयांत १ जीबी डेटा

एअरेटलच्या ६९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ४.१५ रुपयांत १ जीबी डेटा मिळतो. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये रोज २ जीबी डेटा कंपनी देते. प्रत्येक दिवशी १०० फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लॅनमध्ये देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर आहे. तसेच यामध्ये विंक म्युझिक आणि एअरेटल एक्स्ट्रिम प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. प्लॅनच्या स्बस्क्रायबर्सला फास्ट टॅग खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅग मिळतो.

व्होडाफोन आणि जिओचा असा प्लॅन

व्होडाफोन आणि जिओ सोबत या प्लॅनची तुलना केली तर या कंपन्यांचा सुद्धा असाच एक प्लॅन बाजारात उपलब्ध आहे. रिलायन्स जीओचा हा प्लॅन ५९९ रुपयांचा आहे. त्यामध्ये १ जीबी डेटा ३.५ रुपयांना मिळतो. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची असून त्यात रोज २ जीबी डेटा मिळतो. तर व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या पोर्ट फोलिओ मध्ये ६९९ रुपयांचा एक प्लॅन असून त्यात कंपनी डबल डेटा म्हणजे २ जीबी प्लस २ जीबी देत आहे. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. त्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री एसएमएस सारखे फायदे मिळतात.