फायद्याची गोष्ट ! Airtel चा नवीन प्लॅन, चौघांचं बिल फक्त 999 रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या टेलिकॉम कंपन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक प्लॅन आणत आहेत. तसेच एअरटेलने आपल्या युजर्संसाठी एक खास पोस्टपेड प्लॅन आणला आहे. एअरटेलने ९९९ रुपयांचा प्लॅन आणला असून या प्लॅनमध्ये १५० जीबी डेटा मिळणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेलने हा प्लॅन आणले आहेत .

९९९ रुपयांच्या एअरटेल प्लॅनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या प्लॅनमध्ये कुटुंबातील ४ सदस्यांना जोडता येते. म्हणजेच या प्लॅनमध्ये ३ रेग्युलर सिम सह १ डेटा अ‍ॅड-ऑन शक्यता आहे. तसेच अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलची सुविधा आहे. एअरटेलच्या या पॅकमध्ये एक वर्षापर्यंत मोफत प्राइम आणि ५ जी चे सदस्यत्व मिळत आहे. एअरटलेच्या या प्लॅनमध्ये १५० जीबी डेटा (४जी) मिळतो आहे. एअरटेलने ९९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये बेस्ट सेलिंग पोस्टपेड प्लॅन असल्याचे म्हटले आहे.

हँडसेट प्रोटेक्शन सह एअरटेल Xtream यासारखे फायदे आपल्याला ९९९ रुपयांच्या एअरटेल पोस्टपेड फॅमिली प्लॅनमध्ये मिळत आहेत. त्यासोबत Airtel Thanks ची सर्व सुविधा या पॅकमध्ये मिळत आहे.