Airtel Recharge Plan | एका रिचार्जमध्ये चार लोकांचा चालेल फोन, या कंपनीने काढली ऑफर, Amazon Prime सुद्धा मिळेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Airtel Recharge Plan | Airtel ही देशातील दुसरी सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आहे. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लान ऑफर करते. ब्रँड वेगवेगळ्या प्लानमध्ये वेगवेगळ्या सर्व्हिस देतात. एअरटेल त्यांच्या एका प्लॅनमध्ये जास्तीत जास्त फायदे देते. (Airtel Recharge Plan)

 

या प्लॅनमध्ये एक महिन्याची व्हॅलिडिटी मिळते. एअरटेलचा हा प्लॅन फॅमिली रिचार्ज आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांचे तपशील जाणून घेऊया.

 

हा एक पोस्टपेड प्लान आहे, ज्यामध्ये यूजर्सला अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही बजेट प्लान शोधत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी नाही. कंपनीच्या या रिचार्जचे अनेक फायदे आहेत. पण त्याची किंमतही जास्त आहे. (Airtel Recharge Plan)

 

एअरटेलचा सर्वात महागडा प्लॅन
कंपनीचा सर्वात महाग पोस्टपेड प्लान 1599 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दर महिन्याला 250जीबी डेटा मिळतो. तुम्ही हा रिचार्ज प्लॅन विकत घेतल्यास, तुम्ही तीन कनेक्शन जोडू शकता.

 

म्हणजेच, इतर तीन लोक तुमचा प्लान शेअर करू शकतील. यामध्ये सर्व अतिरिक्त कनेक्शनला 30GB डेटा मिळेल. तसेच, हा प्लान 200GB डेटा रोलओव्हरसह येतो. सर्व यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळेल.

 

यामध्ये दररोज 100 SMS दिले जातात. यासोबतच यूजर्सना Airtel Thanks अ‍ॅप्सचाही फायदा मिळतो. यूजर्सला Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

999 रुपयांपासून सुरू फॅमिली प्लान
हा रिचार्ज प्लान कंपनीचा सर्वात महागडा पोस्टपेड प्लान आहे.
या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा, कॉल, SMS आणि OTT चा लाभ मिळतो. मात्र, यामध्ये अतिरिक्त डेटा महाग आहे.

 

तुम्ही फॅमिली प्लॅन शोधत असाल तर हा रिचार्ज प्लान एक चांगला पर्याय असू शकतो.
एअरटेल फॅमिली पोस्टपेड प्लॅन 999 रुपयांपासून सुरू होतो. या प्लानमध्ये तीन यूजर्स आपला फोन वापरू शकतात.

 

Web Title :- Airtel Recharge Plan | airtel postpaid plan for family with 4 connection data call sms netflix amazon prime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगररचना उपसंचालकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणारा नाशिकच्या पोलीस कर्मचार्‍यासह तिघे गजाआड

 

Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज नांदेड ते पुण्यापर्यंत धावणार

 

Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; लष्करी जवानांचा समावेश, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले