‘एअरटेल’ अन् ‘जिओ’कडून एकमेकांचे ग्राहक तोडण्यासाठी 100-100 रूपयांचं ‘बक्षिस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिलायंस जिओ आणि भारती एअरटेलनं आपले ग्राहक वाढवण्यासाठी अनोखा जुगाड शोधला आहे. एकमेकांचे ग्राहक पळवण्यासाठी कंपन्यांकडून रिटेलर्सना इन्सेंटीव जाहीर करण्यात आला आहे. जिओ आणि एअरटेल तशा तर दोन्ही आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. आता या कंपन्यानी एकमेकांचे ग्राहक आकर्षित करण्याचा सपाटा लावला आहे.

अनेक डिस्ट्रीब्युटर्स आणि किरकोळ विक्रेत्यांनी सांगितलं आहे की, भारती एअरटेल कंपनीनं जिओचे 2 ग्राहक फोडण्यासाठी 100 रुपायांचा इन्सेंटीव जारी केला आहे. इतकेच नाही तर जिओनं देखील नवीन सीमकार्ड कनेक्शनचं कमिशन वाढवलं आहे. हे कमिशन 100 रुपयांपर्यंत केलं आहे. जिओ प्रत्येक सीमकार्ड कनेक्शनमागे रिटेलर्सला 40 रुपये एवढं कमिशन देत होतं. आता हे कमिशन वाढवून थेट 100 केलं आहे.

मागच्या आठवड्यात वोडाफोन-आयडिया, एअरटेल सहित जिओनंही आपले रिचार्जचे पैसे वाढवले आहेत. यानंतर आता एकमेकांचे ग्राहक फोडण्यासाठी कंपन्यांचे प्रयत्न सुरु आहे अस दिसत आहे. यासाठी त्यांनी किरकोळ विक्रेत्यांना हाताशी धरलं आहे ज्यांना कंपनीकडून इन्सेटीवदेखील दिला जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/