Lockdown : Airtel ची खास सेवा ! आता ATM पासून फार्मसी स्टोअर पर्यंत कुठेही करू शकतात ‘रिचार्ज’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन दिग्गज दूरसंचार कंपनी एअरटेल (Airtel) ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे आता वापरकर्ते जवळच्या एटीएम, किराणा आणि फार्मसी स्टोअरमधून त्यांचा नंबर रिचार्ज करण्यास सक्षम असतील. यापूर्वी रिलायन्स जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी अशा रीचार्ज सेवा सुरू केल्या होत्या. जाणून घेऊया एअरटेलच्या नव्या सेवेबद्दल…
एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल म्हणाले की लॉकडाऊन दरम्यान आमचे वापरकर्ते एटीएम, किराणा दुकान आणि फार्मसी स्टोअरमधून त्यांचे मोबाइल नंबर रिचार्ज करू शकतील. आम्ही या सेवेसाठी एचडीएफसी, आयसीआयसीआय, बिग बाजार आणि अपोलोबरोबर भागीदारी केली आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की आमचे बहुतेक वापरकर्ते ऑनलाईन रीचार्ज करण्यास सक्षम नाही आहेत याची आम्हाला जाणीव आहे, म्हणूनच आम्ही ही सेवा सुरू केली आहे.
रिलायन्स जिओचा नंबर एटीएममधून होईल रिचार्ज
रिलायन्स जिओने (Relaince Jio) काही दिवसांपूर्वी एटीएमद्वारे रिचार्ज करण्यासाठी आपल्या वापरकर्त्यांसाठी सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत जिओ वापरकर्ते आता एसबीआय, अॅक्सिस, आयसीआयसीआय, एचडीएफसी, सिटी, डीसीबी, एयूएफ आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकांच्या एटीएममधून त्यांचे नंबर रीचार्ज करु शकतील.
एटीएममधून रिचार्ज कसे करावे
जिओ नंबर रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या एटीएम बूथवर जावे लागेल. एटीएम मशीनमध्ये आपले बँक कार्ड टाकावे. आता आपणास रिचार्ज करण्याचा पर्याय दिसेल, ज्यावर क्लिक करावे लागेल. असे केल्यानंतर, आपला थेट नंबर प्रविष्ट करा आणि एटीएम पिन प्रविष्ट करा. आता रिचार्ज रक्कम प्रविष्ट करा आणि कन्फर्म बटणावर क्लिक करा. यानंतर आपल्या जिओ नंबरवर रिचार्ज केले जाईल आणि रिचार्जची रक्कम आपल्या बँक खात्यातून वजा केली जाईल.