‘Airtel’चा ‘स्मार्ट बाइट’ प्लॅन, फक्त 99 रुपयात मिळवा 5 GB ‘डाटा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इतर टेलिकॉम कंपन्याना टक्कर देण्यासाठी भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एअरटेलने आपला नवा स्वस्त आणि आधिक इंटरनेट डाटा देणारा ब्रॉडबँड प्लॅन लॉन्च केला आहे. सध्या टेलिकॉम क्षेत्रात सर्वच कंपन्या आपले ग्राहक टिकावण्यासाठी विविध प्लॅन लॉन्च करत आहे. यामुळे एअरटेलने पहिला स्मार्ट बाइट प्लॅन लॉन्च केला आहे.

एअरटेल वी फाइबर किंवा एअरटेल ब्रॉंडबँडच्या १,९९९ रुपये आणि जास्त किंमतीच्या प्लॅनशिवाय इतर स्वस्त प्लॅन लिमिडेट मंथली डेटा बरोबर देण्यात येतो मात्र १०० Mbps चा स्पीड असल्याने कंपनीकडून देण्यात आलेला लिमिडेट डाटा लवकर संपतो. यामुळे कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी बाइट प्लॅन आणला आहे.

काय आहे स्मार्ट बाइट प्लॅन
याची किंमत फक्त ९९ रुपये असणार आहेत. यात सब्सक्रायबर्सला ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ५ जीबी डेटा ऍड ऑन मिळेल. या सारखा एअरटेलचा आणखी एक प्लॅन आहे तो म्हणजे १९९ रुपयांचा, ज्यात १५ जीबी अडिशनल डेटा देण्यात येणार आहे, तर २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २५ जीबी अ‍ॅडिशल डेटा ऑफर मिळेल.
कंपनीकडे ४९९ चा देखील एक स्मार्ट बाइट प्लॅन आहे, ज्यात ५० जीबी अ‍ॅडिशनल डाटा ब्रॉडबँड यूजर्सला ऑफर करण्यात आला आहे.

जर तुम्ही आधिक इंटरनेट वापरत असाल आणि ब्रॉडबँड बरोबरच अ‍ॅडिशनल डेटा देखील तुम्हाला अपुरा वाटत असेल तर तुम्हाला कंपनीने ७९९ रुपयांचा प्लॅन दिला आहे, यात तुम्हाला ९० जीबी आणि १४९९ रुपयांत २०० जीबी अ‍ॅडिशनल डाटा प्लॅन उपलब्ध करुन दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त